मुंबई : महविकास आघाडी सरकारमधील काही नेते, मंत्री यांच्यावर ईडी चे धाडसत्र सुरू आहे. यायुळे महाविकास आघाडी सरकारमधील एक-एक मंत्री संकटात सापडत आहेत. आता किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत महाविकास आघाडीतील चौथ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यांचे फोटो टि्वट करत आता अनिल परब यांचा नंबर असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
पाच राज्यापैकी चार राज्यांत भाजपला यश मिळाल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. आता त्यांच्या टार्गेटवर परिहवन मंत्री अनिल परब असल्याचे बोलले जाते.
सोमय्या यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, “आता अनिल परब यांचा नंबर
अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकाम साठी आलेला पैसा….चौकशी होणार.
भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार “