रत्नागिरी : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी, शुक्रवारी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली. रत्नागिरीसह जळगाव, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, अहमदनगर, धुळे, सोलापूर,औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अकोला व बीड येथे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम व श्रेणी वर्धनाचे काम हाती घेण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
Posted inमहाराष्ट्र रत्नागिरी
रत्नागिरीसह 16 जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करणार – अजित पवार
