रत्नागिरी: रत्नागिरी विभागात एसटी कर्मचारी हजर होण्याचे प्रमाण वाढत आहे, तीन चार दिवसात 150 हून अधिक कर्मछारी हजर झाले आहेत. तर दररोज जवळपास 150 फेर्या सुटत आहेत, त्यामुळे आता हळूहळू आणखीन संख्या वाढेल असा विश्वास रत्नागिरी विभागाने दिली.
एसटी विलनीकरणाबाबत अद्यापही कोणताही निर्णय योग्य पध्दतीने लागला नाही यामुळे कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणावर मोठी गैरसोय होत आहे. याची जाणीव आता कर्मचार्यांनाही होत आहे त्यामुळे हजर होण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. गुरुवारी एका दिवसात 139 फेर्या दिवसभरात सुटल्या. तसेच चार दिवसातील कर्मचारी हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
येत्या सोमवारी ही संख्या दुपटीने वाढेल अशी माहिती रत्नागिरी एसटी कार्यालयाने दिली, तर यामुळे पुढच्या आठवड्यात बसेसची संख्या अधिक होईल, परीक्षा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी कर्मचार्यांना आवाहनदेखील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Posted inराजकारण
एसटी हळूहळू रुळावर; दररोज धावतायत दीडशे फेऱ्या
