रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत ‘आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग’ अंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी आयोजित ‘उडान महोत्सव २०२२’ दिनांक ८ मार्च ते १० मार्च २०२२ या कालावधीत आभासी (ऑनलाइन) पद्धतीने संपन्न झाला. मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे या महाविद्यालयातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
यामध्ये वक्तृत्व, पोस्टर, सर्जनशील लेखन, लघूपट, पोवाडा गीतगायन या सारखे स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पोस्टर स्पर्धेत प्रणित अरविंद जाधव ( तृतीय वर्ष कला ) याने तृतीय क्रमांक मिळविला. पोवाडा गायन स्पर्धेत पुनम विजय निवळकर आणि सहकारी श्रुती तेरेकर, मृणाली पालकर, प्रज्ञा बारगोडे, श्रुतिका सागवेकर, पूर्वल तावडे, अभिजीत गोताड, विश्वजीत सावंत, अद्वैत नेवरेकर आणि अक्षय देसाई या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पोवाडा गायन साठी ढोलकी वादन कुमार सागर घाणेकर या विद्यार्थ्यांने केले.
उडाण महोत्सवात भरीव कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. राजेश धावडे सर यांचे संस्थेने अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्या स्नेहा पालये आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांनी या विद्यार्थ्यांचे व प्रा. धावडे सरांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.