दत्तराज पतसंस्थेकडून क्युआर कोड वितरण
नृसिंहवाडी
येथील दत्तराज पतसंस्था नेहमीच नव नवीन योजनेतून ग्राहकांना सेवा देत असुन संस्थेने स्वतःचे क्युआर कोड काढून घरबसल्या सभासदांना सेवा देणारी दत्तराज पतसंस्था शिरोळ तालुक्यातील एकमेव पत संस्था आहे.असे मत या प्रसंगी शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेशकुमार मिठारे यांनी व्यक्त केले.यावेळी चेअरमन अशोक पुजारी म्हणाले की सर्व क्षेत्रात ऑनलाईन व्यवहार पहाता ती काळाची गरज ओळखून ही योजना चालू केली आहे.या योजनेत सहभागी होणार्या खातेदारांना संस्थेचा क्युआर कोड दिले जाईल व या खात्यावर रोज जमा होणार्या रक्कमेवर ७टक्के प्रमाणे होणारे व्याज रोजच्या रोज खातेस जमा केले जाईल त्यामुळे सभासदांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले
विवेक पुजारी, दिगंबर शेलार, सुशांत गवळी, विक्रांत गवळी, सुनिल खोंबारे,किरण मुडशिंगे या सभासदांना मान्यवरांच्या हस्ते क्युआर कोड देण्यात आले.यावेळी संचालक-बाळासो बरगाले,राजू पुजारी,उदय कुलकर्णी, राजेंद्र जोशी, श्रीकांत गवळी,संजय कोळी, देवस्थान विश्वस्त-संजय पुजारी, पांडुरंग रूक्के,तर संस्थचे मॅनेजर -शशिकांत कोडणिकर, रमेश टोपकर, शहानुर शेख, योगेश गुळवणी, महादेव सुतार,सागर पडोलकर,सभासद- दत्तात्रय चव्हाण व नृसिंहवाडी चे ग्रामस्थ उपस्थित होते