आसाराम सुटला; मोर्चेक-यांच्या घरात घुसला ?
देशात एकीकडे जागतीक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. त्यात मोठ मोठे कार्यक्रम घेऊन जागतीक किर्तीच्या महीलांची यशोगाथा इतर महीलांपुढे मांडली जात होती. जिजाऊ, आहील्या, सावित्री तसेच रमाई यांचे चरित्र व चारित्र्य तसेच त्यांनी सोसलेल्या झळा व केलेले कार्य यांची ओळख व्हावी याच एका उद्देशाने महीला दिन साजरा केला जातो. कारण, मुलगी सुधारली तर ती दोन घरांना एकत्रीच्या सुत्रामध्ये बांधून दोन घरांचा उद्धार करून ती आपल्या मुला बाळांना संस्कारीत बनवून उद्याचे सुजान नागरीक घडवत असते. त्यामुळे त्या महीलेला ज्यांनी आपल उभ आयुष्य व्यथीत करून आपला एक वेगळा इतिहास घडवला त्यांनी ओळख व्हावी, व त्यातून आजच्या महीलांनी प्रेरणा घेऊन त्या रीतीने आपली वाटचाल करावी हाच एक मुळ उद्देश असतो. पण आजच्या काही महीला मात्र जिजाऊ, आहील्या सावित्री रमाई यांना वाचूण समजून घेण्याऐवजी बुवा बाबा भोंदू संत यांच्या पायावर मस्तक ठेवण्यात स्वतःला धन्य समजात. मग काय त्याचाच फायदा घेऊन बुवा बाबा, रामरहीम व आसाराम सारखे भोंदु जंत या महील्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर शारिरीक व मानसिक अत्याचार करतात. पण शिकार झालेल्या महीला आपली व आपल्या कुटुंबीयांची बदनामी होईल म्हणून त्या तोंड उघडत नाहीत. त्यामुळे एक एक करत अनेक महीला या भोंदू बाबांच्या जाळ्यात सापडतात. पण एखादी महीला किंवा मुलगी त्याविरोधात आवाज उठवते. त्यामुळेच तर आसाराम व रामरहीम यांच्यासारखे अनेक लिंगपिसाट नराधम जेलबंद आहेत. ही काय जादू किंवा चमत्कार नसून हा भारतीय राज्यघटनेचा विजय आहे. पण तरीही काल परवा नांदेडमध्ये आसाराम सारख्या लिंगपिसाट व्यक्तीला जेलमधून सोडून द्यावे यासाठी महीलांनी मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर प्रा. य.ना. वालावलकर म्हणतात की, भक्त ज्यांच्या पायावर श्रद्धेने डोके ठेवतात त्या बुवा, बापू महाराज, स्वामी, आध्यात्मिक गुरू यांच्याविषयी बोलायलाच नको. ‘बुवा तेथे बाबा’ हे अत्रेचे नाटक ज्यांच्या लीलांवर बेतले आहे ते केडगावचे नारायण महाराज, कर्नाटकातील नित्यानंद, गुजरातमधील आसाराम बापू, हरियाणातील रामपाल अशा शेकडो जणांचे लक्षावधी भक्त आहेत. बहुतेक बुवा बापू बलात्कारपटू असल्याचे उघड झाले आहे. तरी भाविकांची त्यांच्यावरील श्रद्धा अढळ असते. म्हणजे या भक्तांना स्त्रियांवरील अत्याचार, त्यांचे लैंगिक शोषण या गोष्टी फारशा अनैतिक वाटत नसाव्यात. त्यामुळे बालिका आणि स्त्रिया यांच्यावरील अत्याचारात आपला देश जगातील टाँप टेनमध्ये आहे यात काही आश्चर्यकारक नाही.
न्याय व्यवस्थेने ज्या आसारामला बलात्कारी घोषीत केले त्याच्या समर्थानात महीलांचे मोर्चे निघत आहेत. तेव्हा म्हणाव वाटत की, होय आसाराम सुटला पाहीजे पण तो सुटता क्षणीच मोर्चेकरी महीलांच्या थेट घरातच घुसला पाहीजे. तेव्हा कुठ ह्या महीलांच्या अध्यात्माच्या घाणीने व धर्माच्या नषेने सडलेला मेंदू जाग्यावर येईल. म्हणून तर भोळ्या श्रध्दाळूंची फसवणूक यामध्ये प्रा. य.ना. वालावलकर म्हणतात की, हे लबाड लोक महाराज, आध्यात्मिक गुरू, स्वामी, बाबा, बापू अशी नावे धारण करून भोळ्या श्रद्धाळूंना फसवण्याचा, त्यांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा धंदा चालवत असतात. महाराज, बुवा, बाबा, स्वामी अशा नावांनी वावरणारे यच्चायावत् सगळे बाबा दांभिक, लबाड, ढोंगी असतात हे वारंवार सिध्द झाले आहे. हे बुवा – बापू आपल्याला सिध्दी प्राप्त झाली आहे अशा थापा मारून अनेक स्त्री पुरुषांना आपल्या भजनी लावतात. खरे तर कोणाकडेही कसलीही दैवी शक्ती नसते. प्रत्यक्षात कोणालाही अलौकिक कसलीही सिध्दी प्राप्त होत नाही. निसर्गनियमांचे उल्लघंन करणारा चमत्कार कोणीही करू शकत नाही, हे वैज्ञानिक सत्य आहे. पण भोळसट माणसांची एखाद्या बुवावर एकदा श्रध्दा बसली की, ती अढळ राहते. इतर बुवा बाबा लबाड असतील; पण आमचे स्वामी खरंच अतिशय चांगले आहेत. निःस्वार्थी आहेत. असा समज असेल तर तो मनातून काढून टाकला पाहीजे. कारण बुवा, बापू, महाराज म्हणजे लबाड ढोंगी हे समीकरण नित्य सत्य आहे.
देशात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. तर दुसरीकडे याच महिला दिनाचे औचित्य साधून नांदेडमध्ये ‘महिला उत्थान’ मंडळाच्या वतीने आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. सदरील मोर्चात आसाराम बापू यांची सुटका करावी अशी मागणी या महिलांनी केली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असा दावा त्यांचे अनुयायी करतात. बापूंची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी या अनुयायांकडून केली जाते. नांदेडमध्ये ‘महिला उत्थान’ मंडळाच्या वतीने महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले की, आसाराम बापू निर्दोष असून एका मुलीच्या सांगण्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. वयाकडे बघता आसाराम बापू यांना त्वरित मुक्त करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. (लोकसत्ता ऑ. ०८ मार्च २२) पण बलात्काराच्या गुन्ह्यात सामिल असलेला आसाराम नावाच जंत हा निर्दोष आहे ?अस भक्तांच म्हणण म्हणजे आपल्या विकृत बुध्दीच व सडक्या मनोवृत्तीच खुल प्रदर्शन करण होय. कारण आसाराम नावाचा जंत हा बालात्कारी असून त्याला न्यायालयाने सजाही सुनावली आहे. म्हणून तर भक्तांचा देव आसाराम नावाचा जंत केवळ भारतीय घटनेमुळे गजाआड आहे. कारण न्यायव्यवस्था ही भक्तांच्या झुंडशाहीवर चालत नसून ती पुराव्यावर चालते हे भक्तांना केव्हा समजेल ?भक्तांचा जंत जर खरच चमत्कारी असेल तर तो गजाआड कसा ?त्याला आपल्यात असलेल्या दैवी शक्तीचा प्रयोग करून जेलच्या बाहेर येता येत नसेल तर ती दैवी शक्ती काय कामाची ?भक्तांनी ज्यांच्यासाठी आजपर्यत काकड आरत्या व माकड आरत्या म्हटल्या त्यांचा आसाराम हा संत नसून तो जंत आहे. पण या भक्ताड पिलावळींना आसाराम हाच आपला बाप व महीलांना सर्वस्वी असल्याचा कळवळा येऊन ते कोर्टाने दिलेल्या आदेशाचा अवमान करत आहेत. म्हणून तर थेट डाँ. अब्राहम कोवूर यांच्या शब्दातच सांगाव वाटत की, जो आपली दैवी शक्ती तपासू देत नाही तो लबाड, ढोंगी आपल्या आध्यात्मिक गुरूची दैवी शक्ती तपासण्याचे ज्याला धैर्य नसते तो भोळसट श्रद्धाळू आणि कसोटी न पाहता जो श्रद्धा ठेवतो तो मुर्ख आहे.
आसाराम बापू या तथाकथित संताविषयी डाँ. बालाजी जाधव म्हणतात की, कुठे ‘परस्त्री आम्हा ! रखुमाई समान’ म्हणणारे जगद्गुरू तुकोबाराय आणि कुठे हा विदेशी महिलेच्या तोंडून ‘आय लव्ह यु’ म्हणवून घेणारा लिंगपिसाट आसाराम अस म्हणत कारण होळीनिमित्त आसारामच्या डे-यात एक कार्याक्रम आयोजित केला होता त्यात आसारामने केलेल्या प्रतापाचा वृत्तांत दि. १५.०३.२००९ रोजी स्ट्रार न्यूज ने ‘ए क्या बापू’ या नावाने दाखवला त्यात आसारामने दिक्षा दिलेले एक विदेशी कुटुंबातील मुलगा व त्याची आई आसारामने आयोजित केलेल्या कार्यक्रात दाखल झाले होते त्या कार्यक्रामात बाबाने त्या मुलाला त्याला अनुभव सांगायला लावला तेव्हा तो मुलगा बाबावर स्तुतीसुमने उधळत उधळत ‘बापूजी मेरे पापा है’ अस म्हणताच बाबाच्या अंतरंगात उकळ्या फुटून त्याच्या अंतर्वस्त्रात पाझर पाझर फुठला नसेल कशावरून ?कारण आसारामने त्या मुलाला प्रतिप्रश्न केला की, ‘मैं तुम्हारे मम्मी का क्या लगता हूँ ?’ हे बाबाचे उद्गार ऐकताच त्या मुलाची आई ‘बापू आय लव्ह यू’ म्हणाली. तेव्हा तर आसारामने ‘आय – हाये’ म्हणत ‘आय हाये बापू मार दिया छक्का’ हे उद्गार काढले होते. म्हणून तर आसाराम बापुचा निर्लज्जपणा या प्रकरणात डाँ. बालाजी जाधव म्हणालेत की, तरुण तरुणींनी.व्हँलेंटाईन डे साजरा करण ही संस्कृती नाही म्हणून तुम्ही मनगटावर तेल ओतुन बोंब ठोकता, मग एका मुलाला, लाखो लोकांसमोर ‘मी तुझ्या आईचा कोण कोण लागतो रे बाळ ?असला विकृत प्रश्न विचारणे म्हणजे संस्कृती आहे काय ?कुठे गेले ते व्हँलेटाईन डे ला विरोध करणारे संस्कृती रक्षक श्रीराम सेनेवाले ?की निषेध म्हणून तरुणींनी त्यांना पाठवलेल्या गुलाबी चड्ड्या धुण्यात व्यस्त आहेत ?.(वाचा नाठाळाचे काठी हानु माथा) आपण ज्याला आपले आदर्श म्हणून ज्यांची पुजा करतो ते लिंगपिसाट होते का याचा कधी विचार केला का ?आपली लोक विचारच करत नाहीत म्हणून तर सत्यानाश झाला आहे. म्हणून माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील ज्यांनी संत उपाधी देतात ते विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
भोगुनी वृंदेशी विष्णु झाला देव ! तैसा ब्रम्हदेव स्वकंन्येशी !
करी बलात्कार आहिल्येशी इंद्र !तरी तो देवेंद्र गणीयेला !
देवाशी ना लाज भक्ताशी नको का ! तरी पुजावे का ऐशा देवा !
म्हणे विश्वांभर करावा विचार ! देव नसे ढोर आहेत हे !
त्यामुळे शेवटी बहुजन समाजातील स्री – पुरुष तसेच तरुण – तरुणींना सागावं वाटत की, कोणत्याही आध्यत्मिक बुवा बाबा आम्मा आम्मीच्या नादी लागून आयुष्याची राखरांगोळी करून घेऊ नका. कारण मी दासबोध जाळणार आहे या पुस्तकात वीर उत्तमराव मोहीते म्हणतात की, अध्यात्म गुढ विद्या नसून ते थोतांड आहे. अध्यात्म लुटारूंचे तत्वज्ञान आहे. पिळवणूक, फसवणूक व गुलामगिरी हा अध्यात्माचा परिपाक आहे. अध्यात्माची उभारणी बहुजन समाजाच्या अज्ञानावर झाली. चिकित्सा व टीका आध्यात्माचे शत्रू आहेत. अध्यात्म हा भारताला जडलेला महारोग आहे. बुवाबाजी भारतात चालणारा बदमाश लुटारूंचा प्रचंड नफेबाजीचा धंदा आहे. ढोंगाशिवाय या अध्यात्माला दुसरे भांडवल नाही. हे वीर मोहीतेंचे शब्द तरुण तरुणींनी ध्यानात घ्यावेत नाहीतर अध्यात्म तुमच्या आयुष्याची होळी करेल, मात्र तेव्हा वेळ गेलेली असेल त्यामुळे आजच सावध व्हा.
‘खरच आसाराम एकदाचा जेलमधून सुटला पाहीजे
अन् भक्ताच्या घरात घूसुन खाटेवर झोपला पाहीजे !
तेव्हा कुठ भक्तांना बाबाचे रंगीन चाळे डोळ्यादेखत कळतील
नाही तर हे साले नारायण साईला भाऊ बनवा म्हणून हट्ट करतील !’
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. 9762636662