कामगार विभागामध्ये काम करणाऱ्या साडेचारशे कंत्राटी कामगारांचे किमान वेतन वाढविण्यास संबंधी शासनाकडे फाईल दाखल
महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार विषयक काम करणाऱ्या साडेचारशे कंत्राटी कामगारांचे वेतन 16000 रुपये वरून दरमहा वीस हजार रुपये करण्यासंबंधीची फाईल कामगार आयुक्त व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिव यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठवली .
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगार यांचे निवेदन कामगार आयुक्त व कल्याणकारी मंडळाचे सचिव यांना मुंबई तेथे १४ मार्च रोजी देण्यात आले
त्यावेळेस त्यांनी अशी माहिती कामगार संघटना शिष्टमंडळास दिली.
महाराष्ट्राचे कामगार आयुक्त श्री सुरेश जाधव यांनी सांगितले की, निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने कंत्राटी कामगारांना किमान वेतन बाबतचे जे निवेदन दिले आहे त्याबाबतचा अहवाल महाराष्ट्र शासन व कामगार मंत्री यांच्याकडे पाठवलेला आहे.
या अहवालामध्ये सध्या आयटीआय व ब्रिक्स कंपनीत काम करणारे कामगार विभागातील ४५० कर्मचारी कामगार यांना दुकाने संस्था मध्ये काम करणाऱ्या व्यापारी विभागांमधील कामगारांचे महाराष्ट्र शासनाने किमान वेतन लागू केलेले आहे. ते दरमहा सोळा हजार रुपये देण्यात येते. हे अन्यायकारक आहे. वास्तविक कामगार विभाग शासनाचा भाग असल्यामुळें ही काही व्यापारी संस्था नाही. त्यामुळे त्यांना शासनामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराना जे किमान वेतन दिले जाते ते किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध स्थानिक संस्थेमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना सध्या 20160 रुपये किमान वेतन आहे ते किमान वेतन देण्याबाबत शासनाने निर्णय करावा अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनात मागण्या केल्यानुसार कामगार आयुक्तांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार यांचे जे ऑनलाईन अर्ज पेंडिंग आहेत, ज्या आर्जंचे नूतनीकरण अद्याप मंजूर झालेले नाही व लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांच्या संदर्भात जलद गतीने काम केले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले. त्या वेळेस बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्रीरंगम उपस्थित होते .त्यांनी याबाबत आश्वासन दिलेले आहे. शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी, श्री उमेश अग्निहोत्री, कॉम्रेड रमेश जाधव, कॉ सुनील पाटील व कॉ धनराज कांबळे यांचा समावेश होता.
Posted inमहाराष्ट्र मुंबई
कामगार विभागामध्ये काम करणाऱ्या साडेचारशे कंत्राटी कामगारांचे किमान वेतन वाढविण्यास संबंधी शासनाकडे फाईल दाखल
