साडेचार महिन्याचा कालावधी लोटूनही विस्तार अधिकारी यांचेकडून ग्रामपंचायत गदगाव येथील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास हेतूपरस्पर टाळाटाळ
चिमूर पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या गदगाव येथे २०२१ वा वर्षामध्ये गावातील गटारे उपसा करणे व गाळ फेकणे काम करण्यात आले होते. या कामामध्ये प्रत्यक्षात झालेला खरा खर्च न दाखवता जास्तीचा अवाढव्य खर्च दाखवून विद्यमान सरपंच राजू मुरकुटे हे ग्रामपंचायत वाडीमध्ये बहुमत असल्याने विरोधी गटाला विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करतात व यामुळे गावातील गोळा होणाऱ्या लोकवर्गणीचा दुरुपयोग होत असते हा गैरप्रकार व भ्रष्टाचार उघडकीस यावा या संबंधित प्रकरणाचे कटाक्षाने चौकशी व्हावी या उद्देशाने माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयासमोर यांना पहिली तक्रार २० ऑक्टोंबर २०२१ देण्यात आले तक्रार होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी संबंधित प्रकरणाची चौकशी न झाल्याने दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ ला पंचायत समिती कार्यालय गट गट विकास अधिकारी यांना स्मरण पत्र देण्यात आलेल्या चौकशी होईल या आशेने धीर धरून अर्जदार राहुल काळे सदस्य ग्रामपंचायत गदगाव चौकशी होण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु परत पहिला महिना उलटून गेला तरी संबंधित भ्रष्टाचाराची चौकशी झाली नाही. आणि म्हणून परत दिनांक २७ डिसेंबर २०२१ ला संबंधित विषयाबद्दल स्मरण पत्र दाखल केले आणि तरीसुद्धा आज साडे चार महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा संबंधित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यासाठी नेमणूक झालेल्या पंचायत समिती कार्यालय चिमूर विस्ताराधिकारी श्री उघडे यांच्याकडून हेतूपरस्पर टाळाटाळ होत असून नेहमी उडवा उडवीचे उत्तर मिळत आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी श्री उघडे यांनी प्रकरण लांबविण्यासाठी व प्रकरण थंड बस्त्यात ठेवण्यासाठी भ्रष्टाचारी यांच्याकडून आर्थिक लाभ झाला असेल असे सांगा असल्याच्या तक्रारकर्ते श्री राहुल काळे ग्रामपंचायत सदस्य गदगाव यांचे मत आहे. याकरिता संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी सदर प्रकरणाची शहानिशा करून संबंधित विषयाच्या तक्रारी बाबत तातडीने चौकशी करून झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणावा असेच चौकशी करण्यासाठी हेतूपरस्पर दिरंगाईबद्दल श्री उघडे विस्तार अधिकारी पंचायत समितीचे यांचे वर कठोर कारवाई व्हावी असे तक्रारकर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.