कबनूर ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी काम बंद आंदोलना बरोबर निषेध मोर्चा
कबनूर -(प्रतिनिधी चंदुलाल फकीर) येथील ग्रामपंचायतीने कामगारांना शासनाने ऑगस्ट २०२० मध्ये लागू केलेला किमान वेतन कायदा लागू करावा, दोन महिन्यांचा थकीत पगार मिळावा, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा करावी याबाबत ग्रामपंचायतीने यापूर्वी लेखी आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी केलेले नाही. वेतनवाढ लागू करून घेण्यास असमर्थता दर्शवली.त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेऊन त्यानुसार येथील मुख्य चौकात कामगारांनी कालपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.कामगारांच्या मागण्या ग्रामपंचायतीने तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशाराही संघटनेकडून देऊन सर्व कामगार मिळून गावातून निषेध मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते ठरलें प्रमाणेआज गावातुन निषेध मोर्चा काढणेत आला. दरम्यान ३१ मार्च रोजी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उरूसाच्या तोंडावर काम बंद आंदोलन सुरू झाल्याने गावातील पाणी व आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे .या आंदोलनात महेश पाटील,अमित चंदूरे, विनायक इंगवले,सुकुमार कांबळे,दिलीप शिंदे,औदुंबर साठे,नागेश कांबळे,उत्तम गेजगे, प्रवीण कांबळे,सुरज शिंगे, उत्तम गेजगे,नागेश कांबळे, मीना कांबळे,हेमा भालेकर यांच्यासह क्लार्क,साफसफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचारी सहभागी झाले होते.
Posted inकोल्हापूर
कबनूर ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी काम बंद आंदोलना बरोबर निषेध मोर्चा
