⭕️ खेड , चिपळूण, संगमेश्वर, देवरूख , रत्नागिरी बसफेरीचा मार्ग
रत्नागिरी : तालुक्यातील शिरगाव येथील रहिवाशी, महानगरपालिकेच्या नगरसेविका वर्षा मोरे यांच्यामार्फत १६ मार्च रोजी चाकरमान्यांना शिमगोत्सवाला गावी येण्यासाठी मोफत बससेवेचे आयोजन केले आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोकणवासियांना गावी येण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे . यापार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोफत बससेवेचे नियोजन केले आहे . त्यानुसार ही बस कळवा पूर्व येथील खारेगाव फाटक येथून बुधवारी सकाळी ९.३० वाजता सुटेल. महाड, पोलादपूर, खेड , चिपळूण, संगमेश्वर, देवरूख , रत्नागिरी आदीठिकाणी बसफेरीचा मार्ग असणार आहे . या सेवेचा कोकणवासियांनी लाभ घ्यावा, असे मोरे यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे .