आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्तइचलकरंजीत रविवारी लाकूड ओढण्याच्या शर्यती

आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्तइचलकरंजीत रविवारी लाकूड ओढण्याच्या शर्यती

आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त
इचलकरंजीत रविवारी लाकूड ओढण्याच्या शर्यती

इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी, ताराराणी पक्ष आणि इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 20 मार्च रोजी भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यती आयोजित केल्या आहेत. बैलगाडासह विविध शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच शहरात या स्पर्धा होत असल्याने क्रीडाशौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
रविवार 20 मार्च रोजी सकाळी 8 वाजता ही स्पर्धा नारायणमळा डीकेटीई येथे संपन्न होत आहे. मोठा गट आणि लहान गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. मोठ्या गटातील तीन क्रमांकासाठी अनुक्रमे 51,000/- व निशाण, 31,000/- व 21,000/- अशी बक्षिसे आहेत. तर लहान गटातील विजेत्यास 31,000/- व निशाण, द्वितीय क्रमांकास 21,000/- आणि 11,000/- अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थान आमदार प्रकाश आवाडे हे भूषविणार असून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा शौकिनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *