लासलगाव : तीन हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात सतत घसरण होत असून क्विंटलमागे हजार रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक दाखल झाली आहे. तर, नाशिक, अहमदनगर आणि पुण्यात नवीन उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढली असून मागणी कमी झाल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारात लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात ४२५ रुपयांनी घसरण झाली.