संपूर्ण महाराष्ट्रात २२ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार ‘प्रेम लागी जीवा’

संपूर्ण महाराष्ट्रात २२ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार ‘प्रेम लागी जीवा’

संपूर्ण महाराष्ट्रात २२ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार ‘प्रेम लागी जीवा’

नागपूर // रजत डेकाटे ✍
( संघर्षनायक मिडिया )

नागपूर : मराठी चित्रपटसृष्टीत दररोज नवनवीन प्रयोग करणारे निर्माता कलावंत आपल्या कलेचा ठसा उमटवत असतात. नागपूरकर निर्मात्या प्राजक्ता खांडेकर यांचा ‘प्रेम लागी जीवा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २२ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार असल्याचे अभिनेते सोमनाथ लोहार, अभिनेत्री वैशाली साबळे, रूपाली मोरे, नंदलाल राठोड यांनी आयोजित पत्रपरीषदेत घोषणा केली.

जमीनदार अशोक पाटील, पत्नी सरस्वती, मुलगी सानिका व बहीण प्रियासह आनंदाने राहतो. जीव हा पार्वतीचा मुलगा पाटलाकडे नौकर म्हणून काम करतो. तो जन्मतः मुका असतो पण अत्यंत प्रामाणिक आहे . तो मुका असल्याने पाटलाचा बऱ्याच वेळा मार खातो. चूक नसतांनाही त्याला उपमान सहन करावा लागतो. प्रियाला कॉलेजला रोज तिचा ड्रायव्हर सोडतो. पण तो चुकून प्रियाला बघतो पाटलाचं लक्ष जाताच, पाटील खूप मारतो. दुसरा ड्रायव्हर शोधेपर्यंत जीव प्रियाला कॉलेजात सोडायला जातो. गरीब प्रामाणिक साधा भोळ्या जिवाबद्दल प्रियाच्या मनात सहानुभूती असते. पण जेव्हा पासून, ती त्याच्या सायकल वर जाते तेव्हा कळात – नकळत तिचे जीवावर प्रेम होते. या कथानकास घेऊन ‘प्रेम लागी जीवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याची माहिती चित्रपटाच्या निर्मात्या प्राजक्ता खांडेकर यांनी पत्र परिषदेत दिली.

कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड ही कंपनी मुख्यतः नागपूरची असून, निर्माती गीतकार प्राजक्ता खांडेकर व नागेश थोंटे यांची आहे. कस्तुरी फिल्म निर्मित ‘प्रेम लागी जीवा ‘हा मराठी चित्रपट २२ एप्रिल शुक्रवार रोजी ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माती प्राजक्ता खांडेकर असून, सहनिर्माता नागेश थोंटे आहेत. प्राजक्ता यांचा निर्माता म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोमनाथ लोहार यांचे आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील उदगीर येतील वाढवना या गावी व आजूबाजूला तसेच कोंकण येथे हेदवी बीच वर झाले आहे. चित्रपट निर्मिती संस्था नागपूरची असल्याने नागपूरकर रसिक प्रेषक व श्रोत्यांचा विशेष अभिमान आहे.

या चित्रपटात कथा / पटकथा / संवाद प्राजक्ता खांडेकर असून संगीतकार जब्बार धनंजय आहे . यात कलाकार म्हणून सोमनाथ लोहार, वैशाली साबळे, रवींद्र थोंटे, जॉनी रावत, राजेंद्र जाधव, मयुरी नव्हाते, राजश्री अहिरे , माधुरी वरारकर, खराडे , रविराज सागर , साक्षी सावंत , दीपाली लोहार, आकाश दळवी , विष्णू उपाध्ये , राजेंद्र कांबळे, अनिल सुरवसे , ज्योती पाटील, वैष्णवी बरुरे, सौन्दर्या स्वामी आदींनी काम केलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *