कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी सरपंचच्या समोर ठोकली बोंब
कबनूर -( प्रतिनिधी चंदुलाल फकीर) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबतचे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासन आपल्या मतावर ठाम आहे. ग्रामपंचायत कामगारांच्या मागण्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत मान्य न झाल्याने सर्व कामगारांनी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या दारात शिमगा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व कामगार देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात एकत्र जमले त्यानंतर सरपंच सौ.शोभा पोवार यांच्या घरी जाणार होते तेवढ्यातच सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात आल्याचे कळल्याने सर्व कामगार त्यांच्यासमोर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन बसले त्यांच्याशी चर्चा केली मात्र सरपंच आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सर्व कामगारांनी बोंब मारो आंदोलन सुरू केले. त्यानंतर कॉम्रेड आप्पा पाटील यांनी लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Posted inकोल्हापूर
कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी सरपंचच्या समोर ठोकली बोंब
