रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल दि. 20 मार्च रोजी संपणार आहे. दि. 21 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, कृषी पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे यांच्यासह अन्य सदस्यांचा कार्यकाल दि. 20 मार्च रोजी संपत आहे. पदाधिकार्यांना दि. 20 मार्चपर्यंत निवासस्थाने व वाहने जमा करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत. त्यानुसार पदाधिकार्यांच्या स्वीयसहाय्यकांनी कार्यवाही सुरू केली असल्याचे चित्र जिल्हा परिषदेमध्ये पहावयास मिळत आहे.
कामकाजाच्यादृष्टीने गुरूवारी शेवटचा एक दिवस शिल्लक राहिला असल्याने सर्वच पदाधिकार्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील कार्यकत्यांनी हजेरी लावल्याचे चित्र झेडपीत पहावयास मिळत होते. तसेच ज्या-ज्या विभागांत मतदारसंघातील प्रलंबित कामे आहेत त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना बोलावून ही कामे मार्गी लावताना पदाधिकारी दिसत होते. दि. 21 मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
Posted inरत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपणार; सोमवारपासून CEO डॉ.जाखड पाहणार प्रशासकीय कामकाज
