लाकूड ओढण्याच्या शर्यतीचा पुन्हा एकदा धुरळा…
आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी, ताराराणी पक्ष आणि इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण मळा, डिकेटीई येथे भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या लाकूड ओढण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब आणि जनता बँक संचालक स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थान काळापासून सुरु असलेल्या या शर्यतीची परंपरा पाहण्याची हजारो शौकिनांचे डोळे आसुसलेले होते. न्यायालयाने बैलाच्या शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इचलकरंजी येथे लाकूड ओढण्याच्या शर्यतीला प्रारंभ झाला आहे. केवळ काही मिनिटांत एका बैलाची पार पडणारी ही शर्यत व भिंगरीप्रमाणे पळणाऱ्या बैलांच्या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती.
यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्यासह सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह शर्यत प्रेमी उपस्थित होते.