रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या भाट्ये येथील वृद्धेचा मृतदेह रत्नागिरीतील भगवती किल्ल्याच्या मागील बाजूस खडकात आढळून आला. शनिवारी दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. रजिया मोहम्मद होडेकर (वय 65, राहणार नवानगर, भाट्ये, रत्नागिरी) असे महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा मुलगा रऊफ मोहम्मद होडेकर (वय 44) याने बेपत्ता असल्याबाबत फिर्याद पोलिसांत दिली होती.
बेपत्ता वृद्धेचा भगवती किल्ल्याच्या मागील बाजूस आढळला मृतदेह
