अखेर 9 वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्यांना साक्षीदाराने ओळखले

अखेर 9 वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्यांना साक्षीदाराने ओळखले

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या आरोपींना ओळख साक्षीदाराने ओळखले आहे. या साक्षीदाराने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन खुन्यांना प्रत्यक्षदर्शी ओळखले आहे. साक्षीदाराने अंदुरे आणि कळसकर या दोघांनी दाभोळकरांवर गोळीबार करून पळून गेल्याचे साक्षीदाराने सांगितले आहे.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी त्या पुलावर साफ सफाई करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी तेथील एका झाडावर माकड आले आणि कावळ्यांचा आवाज देखील आला. साक्षीदार तिकडे पाहत असताना, एका व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या साफसफाई कामासाठी निघून गेलो, अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. तसेच विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ॲड. ओंकार नेवगी यांनी कामकाज पाहिले आहे. बचाव पक्षाकडून विरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *