मुंबई : राज्यातील पोलिस भरतीमध्ये एनसीसीचे प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी शालेय दशेत असल्यापासून एनसीसीमध्ये सहभागी होतात. पुढे जे उमेदवार विविध टप्पे पार करीत प्रमाणपत्र मिळवतात. त्यांना लष्करात भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात ज्या उमेदवारांकडे एनसीसीचे ‘ए’ सर्टिफिकेट असेल, त्याला 2 टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी मिळतील. ‘बी’ सर्टिफिकेट असलेल्या तरुणाला 3 टक्के मार्क मिळतील. तर ‘सी’ सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना 5 टक्के मार्क मिळतील. राज्यातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीसाठी कठीण तयारी करीत असतात. एनसीसीचे उमेदवारांना राज्यातील पोलीस दलांमध्ये भरती होण्यासाठी या निर्णयाचा उपयोग होऊ शकतो.