वाटद- खंडाळा बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील तथा भाई जाधव यांची नियुक्ती

वाटद- खंडाळा बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील तथा भाई जाधव यांची नियुक्ती

⭕ सभापतीपदी मालगुंडच्या रजत पवार यांची नियुक्ती

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद- खंडाळा दीक्षाभूमी येथील बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या कार्याध्यक्षपदी वाटद गावचे सुपुत्र आणि धडाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील तथा भाई जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

रविवारी रविवारी बावीस खेडी बौद्धजन संघाच्या विशेष सभेचे आयोजन दीक्षाभूमी बुद्ध विहार वाटद खंडाळा येथे करण्यात आले होते यावेळी झालेल्या सभेमध्ये बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा व नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये प्रमुख कार्याध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक नेतृत्व आणि आणि वाटद गावच्या तंटामुक्त समितीचे विद्यमान अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती गाव शाखा वाटद पश्चिमचे अध्यक्ष तथा विविध धार्मिक व सामाजिक कार्यात ज्यांचा विशेष सक्रिय सहभाग व मोलाचे योगदान असणारे सुनील तथा भाई जाधव तर सभापतीपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मालगुंड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक१७ चे विद्यमान उपाध्यक्ष रजत रघुनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच संघटनेच्या प्रमुख चिटणीसपदी वाटद- पूर्व येथील युवा कार्यकर्ते स्वप्निल जाधव तर सरचिटणीस म्हणून प्रशांत मोहिते (जयगड) आणि मंगेश पवार ( कासारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर कार्यकारिणीतील उपसभापती निवृत्त माजी सैनिक आणि कोळीसरे गावचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष आर .डी. सावंत तर उपाध्यक्षपदी भालचंद्र कांबळे ( आगरकर)आणि राजेंद्र जाधव ( साखरी जयगड) तसेच कोषाध्यक्षपदी कळझोंडी गावचे विद्यमान सल्लागार आणि पत्रकार किशोर पवार यांची तर हिशोब तपासणीस म्हणून गडनरळ येथील जेष्ठ कार्यकर्ते धर्मदास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उर्वरित कार्यकारिणी सदस्यांमध्ये दिनेश कदम निवेंडी,कुलदीप जाधव वरवडे,राहुल जाधव सैतवडे, विश्वास जाधव भगवतीनगर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. एकूणच बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा व नियुक्ती आणि विशेष सभेचे आयोजन संघटनेचे माजी अध्यक्ष शरद रामचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार ,तालुका समितीचे कोषाध्यक्ष मंगेश सावंत,बावीस खेडी बौद्धजन संघाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा संचिता पवार आदींसह विविध गावात प्रतिनिधी उपस्थित होते. या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई जाधव यांची निवड करण्यात आल्याने वाटद- खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहाराच्या बुद्ध विहाराच्या बौद्ध विहाराच्या परिसरात नव्याने विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल तसेच विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी करताना दीक्षाभूमी बुद्धविहाराच्या नावलौकिकास नवा साज येईल,असा आशावाद संपूर्ण बावीस खेडी बौद्धजन संघाच्या गाव शखांमधूनका व्यक्त केला जात आहे.या नव्या पदाधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार व त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकारणीकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे तसेच बावीस खेडी बौद्धजन संघाच्या गावशाखांचे सर्व प्रमुख प्रतिनिधी व बंधू-भगिनींकडून अभिनंदन केले जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *