मुंबई : सोन्याच्या किंमतीत सतत चढउतार होत असतात. आज म्हणजेच २३ मार्च रोजी देशात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. देशात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत प्रतितोळा ४७,७५० रुपये झाली आहे. काल ही किंमत ४७,४०० रुपये होती, २२ कॅरेट सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे ३५० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. युक्रेन रशिया युद्धाचे परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. त्यामुळेच सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
देशात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ४०० रुपयांची वाढ होऊन ५२,१०० रुपये झाली आहे. कालच्या दिवशी ही किंमत ५१,७०० रुपये होती.
चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर आज एक किलो चांदीचा दर ६८,९०० आहे. त्याच वेळी, ही किंमत काल ६८,३०० होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे ६०० रुपयांची वाढ झाली आहे.