रत्नागिरी : आज राणेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे एन्ट्री करणार आहेत, त्यामुळे तिथे ते काय बोलणार याची उत्सुकता असेल.
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे 28 ते 30 मार्चपासून कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे सकाळी चिपी विमानतळावर लॅन्ड होतील. यानंतर ते मालवण जेट्टीवर पाहणी करतील. मग कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन देवगड मतदारसंघात म्हणजे नितेश राणेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेतील. देवगड नगरपंचायतीत शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
थेट राणेंच्या बालेकिल्ल्यात घुसून आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतील. विधानभवनातलं म्यॉव म्यॉव प्रकरण असेल किंवा दिशा सालियन प्रकरण, विविध प्रकरणात राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. आता त्यांच्याच मतदारसंघात दाखल होत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.