रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक 20 एप्रिल ते 29 एप्रिल या 10 दिवसांच्या कालावधीत स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्यासाठी कागदी आणि कापडी पिशव्या बनविण्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण हे सलग 10 दिवस असून सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत होईल. एकूण 24 प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात विविध प्रकारच्या कागदी पिशव्या, लखोटा, फाईल, गिफ्ट बॅग भाजीची पिशवी, बनियन बॅग, समोसा बॅग,झोला बॅग, पाऊच, साडी फोल्डर, फॅन्सी बॅग इ. शिकविले जाणार आहेत. प्रशिक्षण हे मोफत असून चहा नाष्टा जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणासाठी 18 ते 45 वयोगटातील रत्नागिरी जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज भरणाऱ्या लाभार्थ्याला शिवणयंत्र चालवता येणे आवश्यक आहे. अर्ज भरणासाठी येताना 1 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स, मतदानकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान यांचेमार्फत देण्यात येणारे शिफारस पत्र, दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला कार्यालयीन वेळेत खालील पत्त्यावर घेवून येणे. अर्ज भरल्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना फोनद्वारे कळविण्यात येईल.
दि. 16/04/2022 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. प्रशिक्षणाचा पत्ता व अर्ज भरण्याचा पत्ता – स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साई नगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव. रत्नागिरी. शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 05 या वेळेत 9834015522 / 02352 – 299191 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.