सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा व बांधकाम कामगांराचे जोरदार निदर्शने

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा व बांधकाम कामगांराचे जोरदार निदर्शने

28/ 29 मार्च देशव्यापी संप सांगली जिल्ह्यातील आशा व बांधकाम कामगारानी करून सोमवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी बारा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामधील मागण्या — भारत सरकारने 44 कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड लादण्याचा प्रयत्न सुरू केलाआहे तो त्वरित बंद करावा. आणि चार लेबर कोड रद्द करावेत.
देशांमधे चार 4 लेबर कोड अमलात आल्यास देशातील बांधकाम कामगारांचा कायदा रद्द होणार आहे. त्यामुळे आज बांधकाम कामगारांना जे किमान लाभ मिळत आहेत ते लाभ मिळणे बंद होणार आहेत. म्हणूनच देशातील सर्व बांधकाम कामगारांनी दोन दिवस काम बंद ठेवून संप करावा असे कामगार संघटनांनी देशांमध्ये आवाहन केली आहे.
आशा व गटप्रवर्तक महिलांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदना संदर्भात बोलताना श्री दूडी यांनी आश्वासन दिले की सप्टेंबर 2021पासून आजपर्यंत आशा व गटप्रवर्तक यांचे थकलेले मानधन 31 मार्च 2022 पूर्वी देण्यात येईल असे श्री ड्युटी आणि शिष्टमंडळास आश्वासन दिले.
आशा महिलांना कामाची डायरी मार्च 2021तेने एप्रिल 2022 मध्ये देणे आवश्यक होतं परंतु डायरी मार्च 2022 मध्ये दिलेली आहे त्यामुळ शक्य होणार नाही. त्याचबरोबर पुढील वर्षाची डायरी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात येईल असेही आश्वासन दिले .
सध्या देशामध्ये आठ लाख आशा व गटप्रवर्तक महिला काम करीत आहेत. मागील दोन वर्षापासून देशांमध्ये kovid कोविद् महामारी विरोधी संघर्षात आशा व गटप्रवर्तक महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोलाची कामगिरी केलेली आहे.म्हणुनच सन 2005 सालापासून देशांमध्ये काम करणाऱ्या आठ लाख आशा व गटप्रवर्तक महिलांना भारत सरकारने त्वरित कायम कर्मचार्‍याचा दर्जा द्यावा तोपर्यंत त्यांना दरमहा पंचवीस हजार रुपये किमान वेतन देण्याचा निर्णय करावा अशी मागणी करण्यात आलेली . हे प्रधानमंत्र्यांच्या नावावर असलेले निवेदन प्रधानमंत्री यांना पाठवून देण्यात येईल असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी आणि शिष्टमंडळास दिल.
केंद्र सरकारने संमत केलेले कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करा, वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या वाढत्या किमती कमी करा, बेरोजगारी कमी करा , देशातील असंघटित उद्योगातील सर्व कामगारांना दरमहा किमान वेतन 25 हजार रुपये द्या या व इतर मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ शंकर पुजारी,अंजली पाटील, मनीषा कदम , विशाल बडवे ,वैशाली कांबळे, महादेव कांबळे, विद्या कांबळे, अशोक कांबळे ,राधिका राजमाने ,ज्योती नीचळ ववैभव बडवे इत्यादींनी केले.

1 Comment

  1. I’ve been browsing on-line greater than 3 hours these days, but I never found any attention-grabbing article like yours. It is beautiful price enough for me. In my opinion, if all web owners and bloggers made excellent content material as you probably did, the web will be much more useful than ever before. “Perfection of moral virtue does not wholly take away the passions, but regulates them.” by Saint Thomas Aquinas.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *