गेल्या दोन वर्षांपासून निर्बंधामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या १ एप्रिलपासून राज्यातील निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तसेच, येणारे सर्व सण-उत्सव नियम पाळून साजरे करा असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, निर्बंध मागे घेतले असले तरीही अद्याप मास्कमुक्ती करता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजेश टोपे म्हणाले की, राज्यात निर्बंध हळहळू शिथील करतोय, सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा, डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच गुढीपाडव्याबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील. तसेच मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेतील. शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असा मला विश्वास असून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.
निर्बंध मागे घेण्यात येत असले तरीही मास्कमुक्तीचं धारिष्ट्य सध्या करणार नाही, असंही राजेश टोपे म्हणाले. परदेशातील स्थिती पाहता मास्क वापरणं गरजेचं आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून निर्बंध लावण्यात आले होते. आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लसीकरणाचं लक्ष्य गाठण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, प्रवासासाठी लसीकरण बंधनकारक ठेवण्यात आलं आहे. लसीकरण वाढावं याकरता रेल्वेमधील निर्बंध कायम ठेवण्यात आलं आहे. रेल्वे, बस, मॉलमधील शिथिलकरणाबाबत टास्क फोर्सची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
Hello, i think that i saw you visited my weblog thus i got here to “go back the favor”.I’m attempting to find things to enhance my web site!I assume its adequate to make use of a few of your ideas!!