Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर

Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच आलिया भट्ट 2021 वर्षातील महागडी अभिनेत्री ठरली आहे.

2021 चा ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आलिया भट्ट 2021 वर्षातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 वर्षातील ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया चौथ्या स्थानावर आहे. तसेच 2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया सहाव्या स्थानावर होती.

2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात टॉप 10 मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. आलिया भट्ट 68.1 दशलक्ष मूल्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. 2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात सलमान खान आणि शाहरुख खान मात्र मागे राहिले आहेत. तर अमिताभ बच्चन सहाव्या क्रमांकावर आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *