आयकॉन स्टिल प्रायोजित ‘वास्तू २०२२’ च्यामाहिती पुस्तिकेचे अनावरण
इचलकरंजी ‘वास्तू २०२२’ या बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २९ एप्रिल ते २ मे २०२२ या कालावधीत के ए टी पी ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे होणाऱ्या वास्तू २०२२ या प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वास्तू कमिटी चेअरमन नितीन धूत, विकास चंगेडीया, विवेक सावंत, मयूर शहा, अनिल मनवाणी, सुधाकर झोले, जहीर सौदागर, शरद लोकरे, राजेंद्र खंडेराजुरे, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, प्रकाश शहा आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री नामदार जयंतराव पाटील म्हणाले, वास्तू २०२२ हे बांधकाम विषयक भव्य प्रदर्शन महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग नगरीत होत आहे. याचा मला आनंद होत आहे. त्याचबरोबर असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी, इचलकरंजी सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, इचलकरंजी बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉंट्रॅक्टर असो. या सर्व बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर संघटना मिळून हे प्रदर्शन घेत आहेत ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढले. स्वागत वास्तू कमिटीचे चेअरमन नितीन धूत यांनी केले. सदर प्रदर्शनामध्ये इचलकरंजी व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना नविन बांधकाम प्रकल्प व तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था व बँकांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनामध्ये ११५ हून अधिक स्टॉल उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सदर वास्तू २०२२ या बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आयकॉन स्टिल हे आहेत.
फोटो ओळ – वास्तू २०२२ माहिती पुस्तिका अनावरण प्रसंगी जलसंपदा मंत्री मा. श्री जयंतरावजी पाटील, वास्तू कमिटी चेअरमन नितीन धूत, विकास चंगेडीया, विवेक सावंत, मयूर शहा, अनिल मनवाणी, सुधाकर झोले, जहीर सौदागर, शरद लोकरे, राजेंद्र खंडेराजुरे, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज आदी.