कबनूर ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी घेतली जल शपथ
कबनुर-(चंदुलाल फकीर) राष्ट्रीय जल अभियान, जलशक्ती मंत्रालय यांचे मार्फत राबविण्यात येत असलेले जलशक्ति अभियान ‘कॅच द रेन ‘अंतर्गत
जिल्हा परिषदेच्या सूचने नुसार येथील कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पोवार होत्या सरपंच यांनी प्रथम स्वागत केले उपस्थितांना शपथ दिली ग्राम विकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी विषय पत्रिका वाचन केले त्यानंतर गावातील बंद पडलेल्या कुपनलिका दुरुस्त करणे, पुनर्भरण करणे, पाण्याचे बंद पडलेले स्तोत्र सुरू करणे, ओढ्याची रुंदी व खोली वाढवणे, वृक्षारोपण करणे, पावसाचे पाणी संकलन करण्याबाबत चर्चा झाली यावेळी उपसरपंच सुधीर पाटील,मधुकर मणेरे,सैफ मुजावर, प्रवीण जाधव, सुनील कडप्पा, शांतिनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, सदस्य नजरुद्दीन मुजावर, इंदिरा महिला पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर मिता पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, कबनूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते उपसरपंच सुधीर पाटील यांनी आभार मानले.
Posted inकोल्हापूर
कबनूर ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी घेतली जल शपथ
