पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या कबनुरचे ग्रामदैवत जंदिसो- ब्राँनसो यांच्या उरुसाची सांगता
कबनुर – (प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर येथील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले ग्रामदैवत जंदिसो-ब्राँनसो उरूसाची उत्साहात सांगता झाली संपुर्ण पंचक्रोशीत कबनूर येथील जंदिसो-ब्राँनसो उरूस म्हणजे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उरूस भरतो अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे बुधवारी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी गंध चढवल्यानंतर महिलांनी स्वतंत्र व पुरुषाने स्वतंत्र ओलेत्याने दंडवत घालणे, गलीप घालने आणि पिरांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती गुरुवारी रात्री पहाटे पाच वाजता मानकरांच्या समवेत वाद्याच्या गजरात शोभेच्या दारूची नेत्रदीपक आताषबाजी करून मानाचा सरकारी गलीप घालण्यात आला उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील,शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमोडेसाहेब व त्यांचे सहकारी यांनी भेट देऊन उरूस परिसराची पाहणी करून सूचना केल्या होत्या उरूस कमिटीने उरूसा करता येणार्या भाविक भक्तांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणे, सीसीटीव्ही लावणे, वाहतूक व्यवस्था,लाईट पाण्याची व्यवस्था, मनोरंजनाचे कार्यक्रम व स्पर्धेचे ठिकाणांची व्यवस्था,याकरता उत्तम उपाययोजना आखल्या होत्या उरुसानिमित्त मनोरंजना करता कव्वाली, तमाशा, कलापथक,पोवाडा, तर स्पर्धेमध्ये पळणे शर्यत, सायकल शर्यत, बैलगाडी शर्यत, कुस्त्यांचे भव्य मैदान अशा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या प्रसिद्ध कव्वाल अजीम नाजा मुंबई व उमरदराज दिल्ली यांच्यातील कव्वालीचा जंगी मुकाबला पाहण्यास मिळाला गुरुवारी सायंकाळी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला, शुक्रवार व शनिवारी कलापथकाचे कार्यक्रम झाले, रविवारी व सोमवारी पोवाडा व भिम गीतांचा कार्यक्रम झाला उरुसानिमित्त विवेकानंदा युवा फाउंडेशन व बहुउद्देशीय संस्था,दुर्गाशक्ती महिलामंच ,सेवाभावी संस्था तरुण मंडळी यांच्यावतीने भाविक भक्तांसाठी मोफत वाहन व्यवस्था व मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती कोरोना महामारी मुळे दोन वर्षे उरूस झालेला नव्हता त्यामुळे यावर्षी भरलेल्या उरुसामध्ये पाच ते सहा लाख भाविकांची हजेरी होती सर्वच व्यापार्यांची मिळून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली त्यामुळे छोटे मोठे व्यवसायिक, मनोरंजनाचे खेळ करणारे व्यवसायिक, कलाकार यांच्यात उत्साह दिसून येत होता या निमित्ताने घेण्यात आलेल्या दहा वर्षाखालील पळण्याच्या शर्यतीत प्रथम विरवर्धन कोळी व पृथ्वीराज अस्वले दुसरा अर्शद सनदी व नीरज जाधव तिसरा शकील सनदी व हर्षवर्धन खुडे यांना तिनीही क्रमांक विभागून देण्यात आले दहा वर्षावरील प्रथम धीरज द्वितीय आर्यन आरडे तृतीय धैर्यशील पवार पळण्याची शर्यत प्रथम अक्षय पवार द्वितीय बाबासो देवकाते तृतीय आदित्य पाटील, सायकल शर्यत प्रथम भुषण पाटील अमोल तांबोळी तृतीय बाळू हिरेमठ यांनी अनुक्रमे एक दोन तीन क्रमांक पटकावले उरूस कमिटीच्या वतीने जनरल बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी जनरल अ गट जनरल अदत दाती व बीनदाती अशा गटातल्या शर्यती घेण्यात आल्या त्यामध्ये अनिल पुणेकर यांच्या बैलगाडीने ११००० चे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले त्याशिवाय बंडा शिंदे, बंडा खिलारे यांचा बैलगाडीने यश मिळवले तर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाने चांगलीच रंगत आणली यामध्ये शिवरामदादा तालीम पुण्याचा पैलवान शुभम सिदनाळे आणि छत्रपती शिवाजी आखाडा कुर्डूवाडीचा पैलवान अभिजित काळे यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी झालेली अटीतटीची लढत अखेर बरोबरीत सोडविण्यात आली त्यामुळे एक नंबर विजेत्या पैलवानास देण्यात येणारी चांदीची गदा पुढील वर्षाच्या प्रथम कुस्ती विजेत्या पैलवान साठी राखीव ठेवण्यात आली तसेच दुसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या कुस्त्या अटीतटीच्या झाल्या त्याही बरोबरीत सोडवण्यात आल्या पैलवान शिवय्या पुजारी (बेळगाव) पैलवान संग्राम काकडे (कोल्हापूर)पैलवान इंद्रजीत मुळे (कोल्हापूर) पैलवान रुपेश पाटील (कबनूर) आदिंनी नेत्रदिपक कुस्ती करत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला लहान-मोठ्या जवळपास ९० कुस्त्या पार पडल्या महिला गटातील कुस्त्या रंगतदार झाल्या त्यामध्ये व्यंकोबा तालीम इचलकरंजीची पैलवान कु.स्नेहल पुजारी हिने कोतोलीच्या कु.महेक शेखला चितपट करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले त्याच बरोबर कबनूर तालमीच्या कु. स्नेहल खोत हिने कोतोली तालमीच्या कु.साक्षी पाटील हिला अस्मान दाखवत विजय प्राप्त केला तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोतोली तालमीचे पैलवान कु. साक्षी मगदूम हिने व्यंकोबा तालमीच्या पैलवान कु.ऋतुजा पुजारी हिचा पराभव केला सर्व स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह क्रीडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती या कुस्ती मैदानात पंच म्हणून महापौर केसरी पैलवान अमृता भोसले, अशोकराव पाटील, अण्णा निंबाळकर, बाळू शिंदे, पापालाल आपराध, सरदार मुल्लाणी ,वस्ताद सादळे, रामा माने, बाळू जाधव,बाळू शिंदे,आदींनी पंचाचे काम केले निवेदक म्हणून कुस्ती समालोचक पैलवान शंकरराव पुजारी (कोथळीकर)प्राध्यापक आप्पासाहेब वाघमारे, सुकुमार माळी यांनी काम पाहिले यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच शोभा पवार,उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,मंडळ अधिकारी जी आर गोन्साल्विस, तलाठी पाटील साहेब ,अनंत दांडेकर, कोतवाल शिवाजी चव्हाण पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील साहेब, संचालक प्रमोद पाटील, बी डी पाटील, मधुकर मणेरे,मिलिंद कोले, शिवगोंडा पाटील ढंग,राजू सुतार, उरूस समितीचे सदस्य बबन केटकाळे , विजय देसाई ,पापा सनदी, अल्ताफ मुजावर,हुसेन मुजावर,शकील मुजावर, लियाकत मुजावर,सरदार मुजावर, दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष नजरुद्दीन मुजावर ,उपाध्यक्ष बाळासो मुजावर, सेक्रेटरी रमजान मुजावर,अनिल चव्हाण, अजित मगदूम, महावीर लिगाडे,शंकर पोवार, अण्णाप्पा चव्हाण,संजय सुतार पत्रकार सुरेश कुंभार,चंदुलाल फकीर,युवराज पाटील,शिवाजी चव्हाण, तानाजी पाटील, अजित लटके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते कडक चोख बंदोबस्त, ग्रामस्थांची जागृकता यामुळे कोणत्या प्रकारचे गालबोट न लागता शांततेने आणि संयमाने कबनुरचे ग्रामदैवत जंदिसो-ब्राँनसो उरूसाची सांगता झाली.
Posted inकोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या कबनुरचे ग्रामदैवत जंदिसो- ब्राँनसो यांच्या उरुसाची सांगता
