कुंभारमाठ येथील कापडी पिशवी युनिट व गारमेंटला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
सिंधुदुर्गनगरी, दि. 6 () – महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा स्थापित आंचल ग्रामसंस्था कुंभारमाठ येथील कापडी पिशवी युनिट व गारमेंटला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी भेट देऊन व्यवसाय मार्गदर्शन केले.
महिलांनी वैयक्तिक व्यवसायावर भर न देता सामुहिक व्यवसाय करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. मालवण तहसीलदार अजय पाटणे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लेखाधिकारी आशालता जमने, सिंधुकन्याच्या व्यवस्थापक गीता चौकेकर, सहयोगिनी स्मिता लंगोटे, सिंधुकन्याच्या प्रतिनिधी प्रिया प्रमोद परब, आंचलच्या सचिव सुवर्णा भोगावकर, उपाध्यक्ष प्रिया लंगोटे, सर्व गटातील महिला व पदाधिकारी उपस्थित होते.