प्राथमिक आश्रम शाळा दानवाड व माध्यमिक आश्रम शाळा दानवाड या आश्रम शाळेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिं ६ एप्रिल २०२२ ते दिं १६ एप्रिल २०२२ अखेर सामाजिक समता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आश्रम शाळा व माध्यमिक आश्रम शाळा चे मुख्याध्यापक यांनी दिली.
दिं ५ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघु नाट्य स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे त्याचबरोबर संविधान जागर या संविधान जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले कार्य, महिलांसाठी केलेले कार्य असे विविध कार्यक्रम सामाजिक समता या माध्यमातून शाळेमार्फत करण्याचे आयोजन केले आहे.