‘राज’ कारणातील राजकीय ‘लवंडे’
२०१९ च्या निवडणुकीत स्वतःचा पक्ष इतरांच्या दावणीला बांधून लाव रे तो व्हिडीओ चं गौडबंगाल केल अन् लाखोंची माया याच महाविकास आघाडीच्या लोकांकडून घेतली का ?अस लोकांच्या मनात प्रश्न त्यावेळी येत होता. त्यामुळे राज ठाकरे केवळ बोलका पोपट आहे अस लोकचर्चेत लोक सहज बोलून दाखवतात पण आज हेच पोपटपंची करणारे राज ठाकरे यंदाच्या गुढीपाढव्यादिनी भोंगेला विरोध करून महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढून केंद्रातील भाजप सरकारबद्दल चिडीचूप भुमिका घेताना दिसले. तेव्हा यावेळी काय भाजपच्या दावणीला इंजिन बांधल ?अस लोक म्हणताना दिसत आहेत.
ठाण्यातील सभेतून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट करून भोंग्याला विरोध केला तर याच राज ठाकरेंनी बाबा पुरंदरेंच यांचे पाय चाटले म्हणून अनेक राजकीय लोकांनी त्याचा तिव्र शब्दात विरोध केला. या विरोधाला उत्तर देण्यासाठी त्यांनी उत्तरची सभा आयोजित केली.
गिधड की मौत जब आती है तो वो शहर की तरफ भागता है ! हेच चित्र काल राज ठाकरेंच्या सभेत दिसले कारण त्यात ते भांबावलेल्या अवस्थेत होते. ते बोलताना म्हणाले की, इडीमुळे मला ट्रँक बदलावा लागत नाही, इडीमुळे ट्रँक बदलला हा अनेकांचा गैरसमज आहे. समान नागरी कायदा आणा, लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कायदा आणला पाहीजे अशी मागणी ते मोदीकडे करतात. युपीमधील ज्या बातम्या कानावर येतात तसा विकास झाला असेल तर मला आनंद आहे. सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे व दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत. मस्जिदीवरील भोग्यांचा आवाज बेसूर असतो त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरलेच पाहीजेत असे म्हणाले. त्या राज ठाकरेंना सांगाव वाटत की, तुमचे २०१९ चे लाव रे तो व्हिडीओ बघितल्यास इजिंन ट्रँक सोडूनच नाहीतर कुठे आहे ?समान नागरी कायदा आणल्यास राज साहेब तुमच्याकडील सर्व मालमत्तेचे समसमान वाटप करायला तयार तुम्ही आहेत का ?साहेब लोकसंख्या वाढण्यामागे तुमच्या कुटुबीयांचाही थोडासा हातभार आहे त्यामुळे तुम्हा बापलेकाची नसबंदी करायला काय आडचण आहे ?युपीतील विकासाच्या बातम्या वाचून त्यावर विश्वास ठेवता मग हाथरस येथिल घटनेवर मौन का बाळगता ?जसे सुप्रिया सुळे यांचे दाखायचे सुळे वेगळे आहेत तसेच तुमचेही वेळोवेळी भूमिका बदलायचे दात वेगळे नाहीत कशावरून ?तुमच्या कानांना बेसूर आवाजाचा त्रास होत असल्यास भोंगे उतरलेच पाहीजेत पण कुंभमेळ्यातील नंग्याचा त्रास इतरांच्या डोळ्यांना होतो त्याच काय ?भोंग्यातील निघणारा आवाज बेसूर वाटत असल्यामुळे तो ऐकू वाटत नसेल तर मस्जिदीमध्ये आजान चालू झाल्यास राज साहेब लवंडेंनी
नागपुरच्या सुपरस्टार गायीका अमृता वहीणीची गोड गाणी ऐकायला काय फडणवीस साहेबांची आडचण आहे का ? म्हणून तर संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब म्हणतात की, काल ठाण्यात तुम्ही उत्तर सभा घेतली त्यात चुकीची उत्तरे देऊन मोकळे झालातं !तुम्ही मा. शरद पवार हे जातीयवादी आहेत असं संबोधलं ते कदाचित तुमच्या दृष्टीने खरही असेल पण् त्याहून पुढं जाऊन सांगतो की, मा. शरद पवार यांनी तुमच्या आजोबांच्या म्हणजे प्रबोधन ठाकरे यांच्या विचार प्रेरणेतून निर्माण झालेल्या पुरोगामी चळवळी वापरल्या , नव्हे नव्हे मोडून खाल्ल्या व नेस्तनाबूत केल्या. संभाजी ब्रिगेडचा जन्म हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मा आधीचा आहे . निर्मितीच्या तारखा तपासल्यावर तुमच्या लक्षात येईल. मराठा सेवा संघाने पुस्तके लिहताना संशोधन केले आणि या संशोधन कार्यात तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याचा देखील आधार घेतला आहे. एका अर्थाने तुम्ही प्रबोधनकारांच्या साहित्य निर्मिती वरं आक्षेप घेत आहेत. म्हणजे तुमचं वाचनं कच्च आहे. तसेच ठाकरेंच्या समान नागरी कायद्याच्या मागणीवर राज ऑल इंडिया पँथर सेनेचे दिपक केदार म्हणतात की, ठाकरेंनी आजच्या सभेत आरएसएस चा अजेंडा बोलून दाखवला, समान नागरी कायद्याची मागणी केली. समान नागरी कायद्याची मागणी हे अज्ञान आहे. आधी आपल्याला जातीमुळे मिळालेली प्रॉपर्टी जमा करावी, संपत्तीच्या समान वाटपाची भूमिका घ्यावी तेव्हांच समान नागरी कायद्याची मागणी करावी. ऑल इंडिया पँथर सेना राज ठाकरेंच्या या विधानाचा निषेध करत आहे. हे विधान देशातल्या मागासवर्गीय, दलित आदिवासी, ओबीसी यांची थट्टा करणारे विधान आहे. त्यांनी सामाजिक मागासलेपण समजून घ्यावं, त्यासाठी त्यांनी धर्माने दिलेलं आरक्षण कस बहुजनांचे दमन करत होते, हे समजून घेण्यासाठी महात्मा फुलेंचे शेतकऱ्यांचा आसूड वाचावा अस म्हणाले.
त्यानंतर राज ठाकरेंनी पवारांचा समाचार घेऊन संजय राऊतांविषयी म्हणाले की, वेळोवेळी भूमिका बदलणारे सामनाचे संपादक सजंय राऊत हे लवंडे आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी काय ते संभाजी ब्रिगेड स्थापन केली, त्यामुळे जातीयद्वेष वाढत आहे. शरद पवार नास्तिक आहेत ते देव मानत नाहीत. त्या राज ठाकरेंना सागावं वाटत की, हो राज साहेब वेळोवेळी आपली भूमिका बदलण्यात पटाईत असलेले अनेक जण आहेत. त्यात बाबा पुरंदरेंच्या पायावर नतमस्तक होणारे
मा. शरद पवार, उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मधील सर्व पुढारी व मनसेचे सर्वेसर्वा आपणही लवंडेच आहात. कारण आपलीही भूमिका कधी तळ्यात तर कधी मळ्यात असते, त्यामुळे इतर राजकीय लवंड्याप्रमाणे आपण लवंडे नाहीत हे कशावरून ?राज साहेब संभाजी ब्रिगेडची स्थापना ही राष्ट्रवादीच्या स्थापने पुर्वीची आहे यांचा अभ्यास करा. संभाजी ब्रिगेडमुळे बाबा पुरंदरेची हाड आज जेलमध्ये सडत आहेत हेच तुमच दुखण आहे का राजसाहेब ?इतरांना नास्तिक आस्तिक ठरवण्याचे तुम्ही काय टेंडर घेतले आहे का ?देवा धर्मावर टिका करणारे तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखिल नास्तिकच होते त्याच ठाकरेंचे विचार घेऊन संभाजी ब्रिगेड घराघरात पोहोचली आहे, आणि तुम्ही बसले इंजिनचे डब्बे बदलत. त्यामुळे फेसबुकवर संभाजी कौशल्ये म्हणतात की, कितीही प्रयत्न केले तरी, घसरलेले इंजिन आता रूळावर येत नाही. कारण रेल्वेच्या डब्यांना माहीत झाले आहे की, रेल्वेचा चालक लवंडू आहे, दर पाच वर्षानी पटरी सोडतो. तसेच गंगाधर बनबरे म्हणतात की, मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्र व देशात समता,बंधुता व न्यायाचे विचारकार्य १९९० पासुन करते. पुरुषोत्तम खेडेकरांनी कुणबी -मराठा, बहुजनांना हा वारसा दिला. यामुळे जात -धर्मवादी भोंग्यांना प्रबोधित समाज भिक घालत नाही. राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड ‘बी’ ग्रेड आहे की ‘सी ‘ ग्रेड हे शोधण्यापेक्षा त्यांच्या मिमिक्रीला लोकांनी कोणता ग्रेड दिला आहे, याचा शोध घ्यावा. संभाजी ब्रिगेड समाजातली ए टू झेड विषमता संपावी यासाठी प्रयत्न करत आहे. तसेही माननीय राजसाहेब; आपल्या प्रत्येक भाषणात आपण ब्रिगेडची आठवण काढत आहात त्याबद्दल आभार व धन्यवाद. माणूस मेल्यावर आठवणी शिल्लक राहतात; ब्रिगेड तर विचार आहे तो संपणार नाही, सतत मालक बदलून, मालकांच्या इशाऱ्यावर भोंगे वाजवणारी ब्रिगेड नाही. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या विचारावर चालणारी प्रबोधन चळवळ आहे ब्रिगेड !.
राज ठाकरे म्हणतात की, कोण ते कोकाटे ?घराघरात शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरेमुळे पोहोचले हे नाकारून चालणार नाही अस म्हणाले. त्या राज ठाकरेंना सागावं वाटत की, ज्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अभ्यास करून पीएचडी केली ते इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे आहेत. ते काही पुरंदरे सारखे बनवट शाहीर नाहीत ते याच मातीतले आहेत. आहो राज साहेब तुमच्या व बाबा पुरंदरेंच्या वडीलांच्या शरीरात मानव निर्मितीचे तुमच्या हिस्याचे शुक्राणू निर्माण होण्यापुर्वी म्हणजेच तुमच्या जन्मापुर्वी महात्मा जोतिबा फुलेंनी छ. शिवाजी महाराज यांच्यावरती एक हजार ओळीचा पोवाडा लिहला होता.
मग त्यांचाच आदर्श घेऊन तुमच्या आजोबांनी शिवाजी महाराज स्विकारले. शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी आम्हा बहुजनांना कोण्या बनावट शाहीराची गरज नाही ती गरज तुम्हासारख्या लवंड्यांना आहे. म्हणून तर संतोष बादाडे हे त्यांच्या फेसबुक पेजवर म्हणतात की, पूरंदरेचा जन्मही नसेल तेव्हा महात्मा फूलेंनी शिवरायांना गुरु पदी मानलंय म्हणजे पूरंदरेच्या अगोदर महाराज घराघरात पोहचलेले होते. पूरंदरे भिकारीच होता महाराजांमूळे पुरंदरे आपली झोळी भरू शकला.! तसेच गंगाधर बनबरे म्हणतात की, सूर्य केवळ आमच्यामुळे चमकतो व दिसतो, असं म्हणणारे करोडो जीवजंतू सृष्टीत आहेत. परंतु सूर्यामुळे जीवजंतू व सृष्टीचे अस्तित्व आहे, हे त्रिवार सत्य आहे. असा महाप्रतापी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! घुबडांनी सूर्य पाहिल्याची मर्दानगी सांगू नये !.पुरंदरे यांनी लिहिलेल्या बनावट इतिहासाची चिरफाड डॉ. आ.ह. साळुंखे सरांनी ‘पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर’ या ग्रंथात सप्रमाण केलेली आहे .हे पुस्तक वाचल्यावरही पुरंदरेनी शिवचरित्र घराघरात पोहोचवले असे वाटत असेल तर त्यांच्या मेंदूला रेशीम बागेचा विषाणू चावला असे समजावे.
राज ठाकरेंनी छू म्हणताच धाव घेऊन इंजिनामागे पळत सुटणा-या लोकांच्या विचारात परिवर्तन होत आहे, कारण मागिल तीस वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने जी विचारांची पेरणी केली त्यामुळे लोकांची मस्तक जाग्यावर आली आहेत, हे कोणीही नाकारू शकणार नाही . म्हणून तर लोक फेसबुकवर व्यक्त होऊन राज ठाकरेंच्या वक्तव्याला केराची टोपली दाखवताना दिसतात. त्यात संभाजी ब्रिगेडचे तुषार उमाळे म्हणतात की, राज ठाकरे हा बुड नसलेला वाट चुकलेला आणि अर्धवट ज्ञाणी माणूस आहे. कवडीच ज्ञान नाही या व्यक्तीला, फक्त लोकांनी पुरविलेल्या कॉपीच्या भरवशावर जाहीर सभा पास करतो. तसेच पुढे म्हणतात की, ओ पेंटर ब्रिगेडवर बोलायची लायकी नाही तुमची, आधी तुमच्या आजोबांची पुस्तके वाचा जरा. तर विठ्ठलराव सर्जे म्हणतात की, आज संभाजी ब्रिगेड मुळेच ब.मो. पुरंदरेच्या अस्थी पोलिस कस्टडी मध्ये आहेत, त्यामुळे हा ठाकरेंचा जळफळाट आहे. तसेच शंकर नामदेव नागणे म्हणतात की, इडीच्या भीतीने डोक्यावरून गेले वारे !भुरटे ‘राज’ कारणी तोडती अकलेचे तारे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात रुजतय म्हणून यांचं खाजतय. तसेच सुभाषित पाटील म्हणतात की, दुखत असेल पोटात तुझ्याही शाहू, फुले, आंबेडकर नांव घेताना !तुझा आजोबाही लाजला नाही, या महापुरुषांचे विचार जगताना !तसेच देवीदास जगताप म्हणतात की,जर शेवटी हनुमान चालिसा मशिदीच्याच पुढे म्हणायची असेल, तर कोट्यावधी रूपये खर्चून मंदिरे कशाला बांधायची ? भव्य मशिदच बांधली तर हनुमान भक्तांना आत बसून चालिसा म्हणता येईल.
शेवटी बहुजन समाजातील तरुणांना सांगाव वाटत की, आजचे जे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या पक्षातील राजकीय पुढारी आहेत ते प्रत्येकवेळी आपली भूमिका बदलून महापुरुषाच्या विचारधारेला व समाजाला मातीत घालून आपण लवंडे आहोत हे सिध्द करतात त्या लवंड्यापासून दुर व्हा. आणि आपल्यातील एखाद नवीन नेतृत्व निर्माण करा कारण मला या देशाची शासनकर्ती जमात बनायच आहे हे आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा अस डाँ. बाबासाहेबांनी सागितल आहे. ते बाबासाहेबांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी सज्ज व्हा नाहीतर येणारा काळ तुम्हाला लवंड्या म्हणल्याशिवाय राहणार नाही.
रेपे नवनाथ दत्तात्रय
repe9nat@gmail.com