प्रत्येक भारतीयांचा अस्तित्वाचा दस्तऐवज म्हणजे भारतीय संविधान आहे.:-अमरकुमार आनंद तायडे
जळगाव:-मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा येथे ११ एप्रिल व १४ औचित्य साधून क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त संविधान जागर सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुनील पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख तर प्रमुख पाहुणे आणि वक्ता म्हणून लाभलेले अमरकुमार आनंद तायडे हे होते, त्यांनी सुरुवातीला महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले प्रमुख पाहुण्यांचे सत्कार आयोजक भीमराव कोचुरे व त्यांचे सहकारी यांनी केला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नियोजित आ. चंद्रकांत पाटील हे होते. परंतु अचानक निघालेल्या काही कामानिमित्त ते बाहेरगावी गेल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून मा. सुनील पाटील विधानसभा क्षेत्र हे होते.
त्यांनी मनोगतात सांगितले की महामानवांच विचार समाजात रुजवुन घराघरात पोहोचवा त्यांचे कार्य देशासाठी महान आहे. बहुजनांचे उद्धारकरी फुले-शाहू-आंबेडकर आहेत. व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रमुख पाहुणे व वक्ते अमरकुमार आनंद तायडे केंद्रीय मानवाधिकार नवी दिल्ली यांनी सुरवातीला भारतीय संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधान व आजची तरुण पिढी याविषयी अभ्यासात्मक विश्लेषण करत भारतीय संविधानाणे दिलेले मूलभूत अधिकार व हक्क आजच्या पिढीस महत्त्व पटवून देत डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगत आजच्या घळीला ते कसे मार्गदर्शक आहे यावर ही त्यांनी प्रकाश टाकला तसेच ते बोलताना म्हणाले की, प्रत्येक भारतीयांचा अस्तित्वाचा दस्तऐवज म्हणजे भारतीय संविधान आहे. उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध पणे एकेत होती,प्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, कुन्हा विभागप्रमुख विनोद पाटील, ब्रिजलाल मराठे, दिपक पवार, योगेश पाटील, दीपक वाघ, तावडे सर अहमद शेठ, इमरान हाजी, पोलीस पाटील बसत बाघमार, अण्णा पवार, रशीद मेंबर, प्रमोद वाघमारे, आयोजक भीमराव कीचुरे, मोरे सर, संदीप चाईट, शेख निसार, डॉ. अमोल बोदडे, ऍड. राहुल लहास, अमोल तायड़े, सुरेश मोरे, अकोष लहासे, बसत लहासे, दादाराव शेकोकार, जयपाल कोकार तसेच रमाई महिला बचत गट, बौद्ध पंच मंडळ, समता सैनिक दलाने सर्व सदस्य वढोदा ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रबोधनासाठी हरसोडा येथील निवृत्ती तायडे आणि पार्टी यांचा भीमगीतांचा शाहिरी गायनाचा कार्यक्रम होता. सूत्रसंचालन ऍड. राहुल लहासे तर आभार मोरे सर यांनी मानले.