दंगे म्हणजे नवनिर्माण का ?

दंगे म्हणजे नवनिर्माण का ?

दंगे म्हणजे नवनिर्माण का ?

हिंदू धर्म म्हणजे बिनबुडाचे पिचके गाडगे आहे अस प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणाले त्यांच हे वाक्य चळवळींनी स्विकारल पण त्यांच्याच घरातील राजकीय बांडगुळांनी धिक्कारल ही खुप मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे पार पडला, त्यात राज ठाकरे यांच्या तोंडून विषाचे फुत्कार बाहेर पडताना दिसले. ते म्हणाले की, माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्स धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. तसेच ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. (बीसीसी २ एप्रिल २२) केंद्र सरकारच्या हातच बाहुल बनलेल्या इडीने आजपर्यंत कधीच कवडीच नवनिर्माण ? करू न शकलेल्या राज यांच ऐकूण मदरशात धाडी जरूर टाकाव्यात पण त्या धाडीच काहीच सापडले नाही तर, राज ठाकरेच्या कोहीनूरवर धाड टाकून तेथिल संपत्ती जमा करावी ही शर्त राज ठाकरे मान्य करतील का ?कारण मस्जिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावायची म्हणणा-या राज ठाकरेंनी आपल्या घरात बायका पोरांच्या कानात चालिसेचे श्लोक सांगून त्यांचा काढा करून पाजावा. हनुमान चालिसेचा राज ठाकरेंना जर एवढाच पुळका असेल तर त्यांनी आपल्या नातवाच नाव हनुमान ठेवाव, तेवढाच चालिसेच्या नावाखाली भक्तीचा मलीदा चाखता येईल. म्हणून तर वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून म्हटले की, राज ठाकरे यांच्या विधानात तथ्य असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, परंतु जर या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करून राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात. (मटा ४ एप्रिल २२).
राज्यात नव्याने स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार व त्यांनी केलेली सत्ता स्थापन हे राज ठाकरेंच्या खुप जिव्हारी लागलेल दिसतय म्हणून ते म्हणतात की, मुख्यमंत्री फडणवीस होतील असं पंतप्रधान बोलले तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होतात, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडकतंय, तेव्हा अडीच वर्षांची टूम काढली. एक दिवस सकाळी उठून पाहिलं तर जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले. लग्न कोणासोबत ?ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेससोबत जायला नव्हतं केलं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणती शिक्षा देणार ?(बीसीसी०३ एप्रिल २२) यापुर्वी भाजप सरकार सरकारविरोधात लाव रे तो व्हिडीओ म्हणून गायब झालेले राज ठाकरे काल अचानक शिवतिर्थावर त्याच भाजप सरकारची फळे चाखताना दिसले तेव्हा महाविकास आघाडीतील बांडगुळांना सागावं वाटत की, लाव रे तो व्हिडीओ च्या क्लिप जनतेसमोर लावून नवनिर्माणचं गाजर दाखवणा-या राज ठाकरेंचा भांडाफोड करावा नाहीतर लोक तुमचा सत्कार पायातील पायताने करतील तेव्हा त्याचा दोष कुणाचा देणार ?राज ठाकरेंनी शिवतिर्थावरून पाडव्या दिनी केलेल्या शिमग्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया येत आहेत त्यात शरद पवार म्हणाले की , राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नसतं, २०१९ ला मोदीविरोधी बोलणारे राज ठाकरे काल उत्तर प्रदेशचं कौतुक करत होते. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये कोणता विकास दिसला ?राज ठाकरे व्याख्यान दिल्यावर ३-४ महिने कुठे जातात का कुठे भुमिगत होतात ?. (मटा ३ एप्रिल २२), छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध केला आहे. त्यांनी अचानक टर्न कसा घेतला हे कळलं नाही. ईडीने एकदा बोलावलं तर इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं आहे. कोहिनूर टॉवर हालायला लागला की काय ?. (मटा ०३ एप्रिल २२) तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज ठाकरे रंग बदलणारा सरडा असून सरडाही जितक्या वेगाने रंग बदलत नाही तितक्या वेगाने राज ठाकरे रंग बदलतात. (लोकसत्ता ४ एप्रिल २२) तसेच केद्रींय मंत्री रामदास आठवले हे पुण्यातील पिंपरी चिचवड येथे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभांना केवळ गर्दी जमते पण मत किती मिळतात हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना घेऊन भाजपचा काहीही फायदा नाही. (लोकमत ३ एप्रिल २२).मा. जितेंद्र आव्हाड म्हणतात ते एकदम योग्य आहे कारण इव्हीएम मशीन व लाव रे तो व्हिडीओ वरून युटर्न मारणारे हेच ते भोंग्याचं राजकारण करणारे राज ठाकरे नाहीतर कोण आहेत ?जस वाळूत लघुशंका केल्यास फेस ना पाणी तसेच यांच्या सभांना लाखोंची गर्दी जमते पण प्रत्यक्षात मत कुठे जातात ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
मतदान विरोधकांना करून
राजचे भाषणच ऐकतात हौशी
दोन तास टाईम पास होतो जशी
नाचत राहते तमाशात मावशी.
कुर्ल्यात कालीमाता मंदिरात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यात येणार होती. मात्र तिथे पोलीस आले आणि त्यांनी भोंगे लावण्यास मज्जाव केला. तेव्हा भोंग्याबाबत सर्वांना समान न्याय द्या मशिदीवरचे भोंगे काढा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. ते जय श्रीरामचे नारे देत पोलिसांशी जोरदार हुज्जत घालत होते. तेव्हा पोलिसांनी साऊंड सिस्टीम जप्त केली तर आम्ही हनुमान चालिकाचं पठण करू, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. (झी न्यूज ५ एप्रिल २२) राज ठाकरेंनी मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचं जे आव्हाण केल त्याचा खुप मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. कारण लोकांना समजत आहे की, इतरांना भोंगा काढायला सांगणारे राज ठाकरे आपली व आपल्या मुलाची चामडी का बचावत आहेत ?राज ठाकरेंनी भोंगे काढण्याचा कार्यक्रम जाहीररित्या घेतला पाहीजे पण त्यात पुढच्या फळीत राज ठाकरे व अमित ठाकरे ही ढवळ्या पवळ्याची जोड ?पाहीजे अस सामान्यासह अनेक लोकांच म्हणण आहे. म्हणून तर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार म्हणाले की, राज ठाकरेंच्या घरात कोणत्या मशिदितील भोंग्यांचा आवाज येतोय ते सांगा, धर्म निरपेक्ष भारतात भोंग्यांची तक्रार नाही तर रीस्पेक्ट केली, कुणालाच तक्रार नाही ही केवळ धार्मिक दंगली भडकवण्याचे षडयंत्र आहे. हे लोकांनी आता ओळखल आहे. आता दंगली नको ते पोटाला भाकर हाताला काम हवं आहे अस म्हणाले. राज ठाकरे शिवद्रोही बाबासाहेब पुरंदरेच्या थोतराआड बसून विष पेरण्याच काम करतात ते राज ठाकरे १४ एप्रिल रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करा म्हणतात म्हणून तर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करताना म्हणाले की, राज ठाकरेंच्या घरापासून १० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर राज ठाकरे कधी गेले का ? कधी जय भीम बोलले का ?१४ एप्रिलच्या मिरवणूका दरवर्षी जोरात निघतात. मात्र प्रश्न असा आहे की, आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर तुम्ही किती वेळा गेलात ?(लोकमत ०४ एप्रिल २२) दिल्लीत संविधान जाळल जात असताना षंढाची भूमिका घेऊन कधीही जय भिम न बोलणारे संघ विचारधारेच्या प्रांगणात लोळण घेणारे राज ठाकरे यांच्यामधील भिम भक्त अचानक जागा झाला कसा ?भिमजयंती कशी साजरी करायची हे राज ठाकरेंनी आता समाजाला शिकवू नये कारण महाराष्ट्रात चळवळी अजून जिवंत आहेत. लोकांना तलवार काठ्या वाटपाची भाषा करणा-याकडून भिमजयंती कशी साजरी करायची ह्याचे धडे घेण्याची अजून वेळ आलेली नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
लाठ्या-काठ्या धिंगाना – मस्ती
भोंगे हिंदु – मुसलमान
हनुमान चाळीसा, मदारसा
हेच होणार का नवनिर्माण ?.
‘तलवार वाटपाची भाषा करणा-या राज ठाकरेंना खरच जर त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी संविधान वाटपाचा कार्यक्रम घ्यावा.’ पण राज ठाकरेंना भिती आहे की, आपण जर संविधान वाटप केले तर लोक शहाणे होतील आणि एकदा का लोक शहाणे झाले तर, आपल्या जातीयवादी मेंदूतून निघालेल्या आदेशाचे कोणीही पालन करणार नाही. म्हणून तर ते भोंग्याचं राजकारण करून आपल्या चोंग्या भक्तांना कामाला लावण्यासाठी मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावा असा आदेश देतात. मग त्याचे भक्तही काय तर म्हणे मनसेकडून दिला जातोय मंदिरांना लाऊड स्पीकर भेट (साम टीव्ही ३ एप्रिल २२) .राज साहेबांचा आदेश हा अतिंम असतो म्हणे ?लगेच चोंग्या भक्तांनी अनेक ठिकाणी हनुमान चालीसा लावली. भोंगा बंद व चालिसा सुरूच्या आदेशावरून मनसेत दोन गट पडल्याचे दिसत आहेत त्यात पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ शाखा अध्यक्ष शेख माजीद अमीन यांनी राजीनामा दिला. (एबीपी ४ एप्रिल २२) तसेच पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडताना म्हटले की, मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही तर माजी शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले की, पक्षात राजसाहेबांचा आदेश अंतिम असून वयक्तिक भूमिकेला थारा नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. (मटा ५ एप्रिल २२) अनेकांनी ठाकरेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यावरून स्पष्ट होत की, राज यांना खाज सुटली की, कार्यकर्त्यांनी गप्पगुमान खाजवत बसायची का ?म्हणून तर सुजात आंबेडकर म्हणाले की, पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा, आमच्या बहुजन पोरांना नको, राज ठाकरेंना माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या. तुम्ही स्वतःचा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा करु नका. (मटा ३ एप्रिल २२) तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले की, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे स्वतः भोंगे बंद करायला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का ?दुसऱ्यांचीच घरं किती दिवस जाळणार. किती दिवस आमची पोरं आणि त्यांची डोके भडकवणार !घाणेरडे राजकारण थांबवा, आम्हाला दंगली, वाद नको आहे. का तुमची मुलं स्टडीत, आमची मुलं कस्टडीत !.तसेच विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
ऐन निवडणूकीत डबे
मागच्यामागे गळून पडतात
मग भरकटलेलं इंजीन
जाऊन थांबतं मदरश्यात.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्या नंतर जालन्यात महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या रामभाऊ राऊत चौकात हनुमानाचे २५ फूट उंच फलक लावून जोरदार घोषणाबाजी करत सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती. याचाच निषेध म्हणून रात्री मुस्लिम कार्यकर्त्यांनी भोकरदन नाका परिसरात जोरदार घोषणाबाजी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. (साम ७ एप्रिल २२) त्यामुळे काजल कोठाळीकर म्हणाल्या की, भारताची धर्मनिरपेक्ष ओळख धोक्यात घालून जातीच राजकारण करणाऱ्यांनी भारताचा इतिहास वाचावा. देशाला वाजणारे भोंगे, होणारे दंगे यापेक्षा रोजगार महत्त्वाचा आहे. धर्माचं राजकारण करून देशाचं भविष्य धोक्यात घालू नका..! तर देविदास जगताप पाटील हे फेसबुकवर म्हणाले की, बरं त्ये भोंगे काढायला कुलकर्णी, अभ्यंकर, जोशी, पाठक, उपाध्याय, आपटे, फडणविस, गोखले, गडकरी, ठाकरे यांचीही पोरं असणार की नेहमीप्रमाणे आमच्याच औलादी जाणार ?.
त्यामुळे बहुजन समाजातील तरुणांना सागावं वाटत की, ज्या राज ठाकरेंनी आजपर्यत आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहलेली पुस्तकं वाचली नाहीत हे प्रत्येकवेळी संभाजी ब्रिगेडला दिसत म्हणून तर पाठीमागे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आपल्या स्वखर्चाने राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तक रजिस्टर्ड पोस्टाने घरपोहोच पाठवली होती. पण आजोबांची पुस्तक नातवाने काय केराच्या टोपलीत टाकली का ?जे आपल्या आजोबांचे विचार स्विकारू शकत नाहीत त्यांच्याकडून काय केळाचं नवनिर्माण होणार आहे ?आपला बाप सोडून शिवद्रोही पुरंदरेच्या पायदळी डोक ठेवणा-या दंगलप्रमुखांकडून समता बंधुता टिकवण्याची अपेक्षा करण म्हणजे वांझोट्या गायीकडून दूधाची अपेक्षा करण्यासारख आहे. भोंग्याच मेंगट राजकारण करणा-या राज ठाकरे यांच ऐकून एकमेकांची डोकू फोडू नका कारण तुमची डोकी फुटतील तेव्हा राज ठाकरे तुमच्या मदतीसाठी येणार नाहीत ते आपल्या नातवाचे मुक्के घेत निवांत तुमचा तमाशा बघत बसतील. आज एकीकडे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालणारा वर्ग तयार होतोय तर दुसरीकडे त्याच प्रबोधकाराचे विचार त्याचेच नातू राज ठाकरे दिवसाढवळ्या पायदळी तुडवतात तेव्हा प्रश्न पडतो की, हे राज ठाकरे प्रबोधकाराच्या घरातीलच आहेत का ?म्हणून तर नारायण खराटे म्हणतात की, हा डीएनए प्रबोधनकार ठाकरेंच्या रक्तातला नाही. कारण त्यांच्या विचारांचा किंचितही प्रभाव यांच्यात नाही, हे बेन अलगच आहे ?अस म्हणाले.त्यामुळे जे राज ठाकरे तुम्हाला जातिद्वेषाने प्रेरित करतात त्या बांडगुळांना तुम्ही बहुजन महापुरुषांनी सांगितलेले वैचारिक अश्व लावा. एकदा का जर तुम्ही वैचारिक अश्व लावयला सुरूवात केली तर ठाकरे आणि त्यांचे भाकरे तोंड लवपून बसतील. पण त्यासाठी आधी तुम्हाला प्रबोधनकारांची पुस्तक वाचावी लागतील, नाहीतर राज ठाकरे तुमच्या हाती भोंगा देऊन तुम्हाला सोंग करायला लावतील. त्यामुळे वेळीच सावध व्हा ! कारण भोंगा हा आपला मुख्य उद्देशच नाही आपला मुख्य प्रश्न बेरोजगारी महागाई व ढासळलेला शिक्षणाचा दर्जा हे आहेत. त्यामुळे तुम्ही आता वरील मुद्दासोबत महापुरुषाच्या विचारांच वैचारिक अश्व तयार ठेवा. जर कोणी भडकावू वक्तव्य करू लागला तर तुमच्याकडे असलेल अश्व त्या बांडगुळावर उभ्यान सोडा तेव्हा खरी मजा येईल. राज ठाकरे यांची भडकावू भाषण केवळ टाईमपास म्हणून बघा कारण विद्रोही कवी विश्वंभर म्हणतात तस राजच भाषण ऐकतात हौशी तेवढाच दोन तास टाईम पास होतो, जशी
नाचत राहते तमाशात मावशी.

रेपे नवनाथ दत्तात्रय
repe9nat@gmail.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *