सेवा रुग्णालयात 21 एप्रिल रोजी मोफत आरोग्य मेळावा
कोल्हापूर, दि. 19 ): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सेवा रुग्णालय, लाईन बाझार, कसबा बावडा, येथे करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये ॲपल हॉस्पिटल, कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडीक ॲन्ड ट्रॉमा, सेवा रुग्णालय, लाईन बाझार ही रुग्णालये सहभागी होणार आहेत.
मेळाव्यामध्ये पात्र लाभार्थींना डिजीटल हेल्थ आयडी व आयुष्यमान भारत कार्ड तयार करुन दिले जाणार आहे. यासाठी पासपोर्ट साईज दोन फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड यांचे मूळ कागदपत्र व त्यांच्या दोन प्रती झेरॉक्स व आधार लिंक मोबाईल आवश्यक आहे. याबरोबर सर्व रोग मोफत तपासणी तज्ञ डॉक्डरांमार्फत होणार आहे. उदा. ह्दयरोग, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनीचे आजार, डोळ्याचे आजार (मोतीबिंदू), हाडांचे आजार, गरोदर माता व लहान मुलांचे आजार, कान-नाक-घसा, दातांचे आजार, क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही, आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार व आहाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबीरामध्ये रक्त, लघवी, एक्सरे, ईसीजी व इको या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोफत केल्या जाणार असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.
0000000
You have remarked very interesting points! ps decent website .