भिडेंच्या आंब्यापासून नवनिर्मीती होत नाही ?

भिडेंच्या आंब्यापासून नवनिर्मीती होत नाही ?

भिडेंच्या आंब्यापासून नवनिर्मीती होत नाही ?

उत्तरप्रदेश मधील कानपूर येथिल निरालानगर येथे रेल्वे मैदानात विश्व हिंदू परिषदेकडून रामजन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आल होतं. यात साध्वी ऋतंभरा यांनी संबोधित करताना म्हटले की, प्रत्येक हिंदूने आता चार मुले जन्माला घातली पाहीजेत. यातील दोन मुले कुटुंबासाठी ठेऊन दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली पाहीजेत. त्यामुळे ते राष्ट्रीय यज्ञामध्ये आपल योगदान देऊ शकतील. आपल्यासाठी राष्ट्र हे सर्वोपरी असल पाहीजे. रामभक्त बनण्यासाठी रामत्व धारण करावं लागेल. (लोकमत १८ एप्रिल २२) चार मुल जन्माला घाला असा उपदेश देणा-या ऋतंभरा यांनी किती मुलांना जन्म दिला आहे ?आपली किती मुल आरएसएस व विश्व हिंदू परिषदेला दिली आहेत ?दिली नसतील तर का दिली नाहीत ?आपण माता बनण्याच्या लायकीच्या नाहीत का ?उपदेशाचे डोस इतरांना पाजण्यापुर्वी तो उपदेश आपण साध्य केलाय का यांच भाण ऋतंभर यांना आहे का ?मुल जन्माला घालण म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का ?जर मुल जन्माला घालण धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे एवढ सोप वाटत असेल तर रेशिमबागेच्या प्रांगणात एखादा पुत्र कामेष्टी यज्ञ करून त्याचा प्रसाद प्रदिप जोशीच्या तोंडात तोंड घालून लाळ चाटणा-या स्वयंसेवकांना देऊन ब्रम्हदेवाप्रमाणे स्वयंसेकांच्या मांडी, दांडीतून मुल जन्माला घालायला काय कोणाची भिती वाटतेय का ?.
तसेच या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे हे म्हटले की, एकेकाळी सीतामातेच्या अपहरणामुळे रावणाचा नाश झाला होता. आज आम्हाला लव्ह जिहाद करणा-यांना समूळ उखडून काढल पाहीजे. केवळ रामाच्या पुजेने हे साध्य होणार नाही. (लोकमत १८ एप्रिल २२) लव्ह जिहादच्या नावाने रान पेटवणा-या पांडेय यांना विचाराव वाटत की, हिंदु म्हणून राण पेटवणा-या लोकांंचे जावई मुस्लिम नाहीत का ? त्यांच्या घरातील मुली मुस्लिमांच्या घरी जाऊन सुख उपभोगत आहेत हा याला कोणता जिहाद म्हणायचा ?तुमचं म्हणजे ‘तुम ने किया तो प्यार और उन्होने किया अत्याचार ?’ १९५० च्या ब्राम्हण सभेत कारण ठराव क्र. सात यात म्हटल की, आपल्याला आता अँग्लो ब्राम्हण युनिटी केलीच पाहीजे, तर जगता येईल. आणि ही युनिटी घट्ट करायला शरीरसंबंध व्हावे लागतात. तेव्हा थोडीशी तोशीस सोसणे आपल्याला आवघड नाही असे सांगूण तुमच्या मुलींनी इंग्रजाशी विवाह केला तर त्यावर समाधान मानत होतात. (वाचा दि.ज.स.वा.पान.क्र. १८९) आज हिंदू धर्म धोक्यात आहे जास्त मुल जन्माला घाला असा उपदेश देणा-यांचे बापजादे १९५० सालच्या ब्राम्हण परिषदेत ठराव क्र. दहामध्ये म्हणतात की, मराठ्यांना जर जास्त मुल झाली तर त्यावर कर आकारून मराठा समाजातील तरुण तरुणींना आविवाहीत ठेवावे. (वाचा दि.ज.स.वा.पान.क्र. १८९)
नरसिम्हानंद यांनी यापुर्वी मथुरेत बोलताना म्हटले होते की, हिंदुंना आगामी दशकांमध्ये देशात हिंदू टिकवायचे असतील तर जास्तीत जास्त मुल जन्माला घाला तेच नरसिम्हानंद हिमाचल प्रदेशातील आयोजित केलेल्या धर्मसंसदेत नरसिम्हानंद म्हणाले की, भारताला इस्लामिक राष्ट्र होऊ द्यायच नसेल तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहीजेत (दै. प्रभात १८ एप्रिल २२) तसेच अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेश प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती म्हणाले की, हिंदु बहुसंख्य असल्याने भारत हा लोकशाही देश आहे. परंतु मुस्लिम योजनाबद्ध पद्धतीने अनेक मुलांना जन्म देऊन त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत. म्हणूनच आमच्या संस्थेने हिंदूना भारत इस्लामिक राष्ट्र होण्यापासून वाचवायच असेल तर जास्त मुलांना जन्म देण्यास सांगितल आहे. कारण फक्त दोनच मुल जन्माला घाला अस सांगणारा कोणताही कायदा आपल्या देशात नाही. (मँक्स महा. १८ एप्रिल २२) नरसिम्हानंद यांना विचाराव वाटत की, प्रत्येक कुटुंबाने किती मुले जन्माला घातली म्हणजे धर्माचा संकटातून निसटता विजय होईल ?धर्म संकटात जातोय हे माहीत असतानाही जर नरसिम्हानंद स्वतः मुलांना जन्म देऊ शकत नसतील तर तुम्ही नपुसंक आहात का ?जस गाढव व घोड्याच्या मिलनातून खेचर ही नवी व्हरायटी निर्माण होते तशी देशभरातील सर्व साध्वी व तुमच्यासारखे धर्माच्या नावाने दुकानदारी करणारे बांडगुळ जमवून
एखादी ‘अंधभक्त’ नावाची नवी व्हरायटी काढायला काय आडचण आहे ?धर्म संकटात असताना इतरांकडून मुलांची अपेक्षा करण्यापेक्षा सर्व साध्वींनी आजपासुनच कामाला लागायला काय आडचण आहे. केवळ दोनच मुल जन्माला घालावीत ही अट जशी संविधानात नाही तशी साध्वींनी मुल जन्माला घालूच नयेत ही अट तरी कुठे संविधानात लिहली आहे ?मुस्लिमांना जास्त मुल होतात तर मग साध्वींना का होऊ शकत नाहीत ?मुस्लिम जशी लोकसंख्या वाढवत आहेत तशी लोकसंख्या वाढवण्यासाठी साध्वी, नरसिम्हानंद व यती सत्यदेवानंद सरस्वती या तिघांनी मिळून काही प्रयत्न केले आहेत का ?.
नागपूर येथील धर्मसंस्कृती महाकुंभाच्या धर्मपीठावरून समारोपाप्रसंगी ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती म्हणाले की, आज हिंदुत्व धोक्यात आले असून, हिंदुंची संख्याही वेगाने कमी होत आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर ‘हम दो, हमारे दो’ हे सरकारी आवाहन नजरेआड करीत, एका हिंदू दाम्पत्याने किमान दहा अपत्य जन्माला घालणे आवश्यक आहे. त्यांचे पोट कसे भरायचे, याची चिंता करू नका, त्यासाठी परमेश्वर (देव) समर्थ आहे अस म्हणाले तेव्हा व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व मा. देवेंद्र फडणवीसासह १ हजार ११८ संत उपस्थित होते. (मटा २७ डिसें २०१६) तसेच भाजपचे खासदार साक्षी महाराज म्हणाले की, हिंदू स्त्रियांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या त्यातील एक साधू – संन्याशांना द्या व दुसरा देशाच्या रक्षणासाठी सिमेवर पाठवा अस म्हणाले. तेव्हा काही प्रश्न पडतात कारण, किमान दहा अपत्य जन्माला घाला म्हणणा-या स्वामी वासुदेवानंद सरस्वतींना, साक्षी महाराज, मोहन भागवत व देवेंद्र फडणवीस यांना किती मुले आहेत ?असतील तर त्यातील किती सन्याशी किती ?आणि नसतील तर का नाहीत ?खा. साक्षी महाराज व स्वामी तुम्ही इतरांना उपदेश करण्यापेक्षा संघाच्या शाखेत उपदेशाचे डोस पाजून त्यांच्याकडून किमान दहा मुल जन्माला घालून घेतली तर तुमच्यावर काय ब्रम्हदेव नाराज होणार आहे का ?स्वामीजी, बरे झालो देवा कुणबी झालो म्हणणारे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग इतरांकडून जास्त लेकरांची अपेक्षा करणारे तुम्ही व तुमचे तथाकथित सर्व बांडगुळ बोलल्याप्रमाणे थोडही वागणार नसाल तर प्रा. गंगाधर बनबरे म्हणतात की, बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पाऊले.
औरंगाबाद येथे ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावर बोलताना साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, इतर धर्मियांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुल जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करू शकत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे. त्यासाठी एकापेक्षा अधिक लग्न केले तरी चालतील. (लोकमत २० फेब्रुवारी २०१८) एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा सल्ला देणा-या साध्वी कितीवेळा हळदीने पिवळ्या होऊन लग्नमंडपात गेल्या आहेत ?साध्वीच बोलण म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण असच म्हणाव का ?तुम्ही केलेला मालेगाव बाँम्बस्फोट देशहीतासाठी होता का ? साध्वींजी लोकांना मारण्यासाठी देशातील विविध ठिकाणी मिटींग घेणा-या तुम्ही नव्हता काय ?(वाचा करकरेंना का व कोणी मारले ?) त्यामुळे तुम्ही देशहीताच्या गप्पा मारणे म्हणजे चोरावर मोर होण्यासारख नव्हे काय ?
मुबंईचे पोलिस सह आयुक्तांना यापुर्वी एक चमत्कार झाला होता त्यांचा देव म्हणे पाहीजे त्याला मुल देतो अस म्हणाले होते. तर मग साध्वीजी त्या देवाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढवता येते का ?याचा तुम्ही व साध्वी ऋतुंभरा यांनी प्रयत्न करायला काय हारकत आहे. कारण धर्म संकटात सापडला आहे. तसेच सांगलीच्या आंब्यापासून मुलं होतात याच पेटंट ज्यांच्या नावावर आहे ते शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी हे यापुर्वी रेशिमबागेत आर्ध्या चड्डीवरच हुदडत होते. मग त्यांच्या सहकार्यातून काही करता येत का ?साध्वींजी तुम्ही भिडे मास्तरचे आंबे खाण्याचे थोडसे कष्ट घेतले तर नवनिर्मीती करणं सहज शक्य होणार नाही का ?कारण धर्म संकटात असल्यास त्याला बाहेर काढण्यासाठी जर कुलकर्णी मास्तरच पेटंट उपयोगी पडत असेल तर देशहिताच नाही का ?साध्वीजी तुमच्यासाठी कुलकर्णी मास्तर आपल्या धोतराच्या खोस्यात मित्राच्या शेतातील आंबे आणतील किंवा तुम्हाला आंबराईमध्ये घेऊन जातील. मग साध्वी प्रज्ञासिंह व ऋतुंभरा फक्त भिडे मास्तरचे आंबेच तर चाखायचे आहेत. आंबे कसे खातात याच प्रशिक्षण अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत तथाकथित रामाचे अवतार असलेले मोदी चांगल्या प्रकारच देऊ शकतात. मग त्यांनी खाल्याप्रमाणे चोखून, कापून किंवा वाकून खा आणि संकटातील धर्माला वाचवा.
यापुर्वी अनेक देश व देशातील अनेक धर्मियांनी आपला देश आणि धर्मांची लोकसंख्या वाढवण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहीत केले आहे. कारण भारता शेजारील राष्ट्र चीनच्या ‘नेशनल बिजनेस डेलने’ दिलेल्या वृत्तानुसार चीन सरकारकडून जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देऊन विविध आँफर्स दिल्या आहेत. तिसरे अपत्य जन्माला घालणा-या कर्मचा-यांना एक वर्षाची सुट्टी आणि ११.५० लाख रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. (सामना ३० जाने. २०२२) तसेच हंगेरी या देशात पंतप्रधान व्हिक्टर आँर्बान यांनी लोकसंख्या वाढवण्यासाठी सप्तसुत्री पारिवारिक सुरक्षा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे हंगेरीमध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्माला घालणा-या स्त्रियांना आजीवन आयकर भरावा लागणार नाही. तसेच सर्बियाने नव्या मातांना पहील्या मुलाच्या जन्मावेळी ९५६ डाँलर तर दुस-या मुलाच्या जन्मावेळी ९६ डाँलर आणि तिस-या व चौथ्या मुलांना काही पैसे दिले जातील अशी घोषणा केली आहे. तसेच इटलीमध्ये प्रत्येक मुलाच्या जन्मावेळी स्त्रियांना ९० डाँलरचा भत्ता दिला जातो. (माझा पेपर १५ फेब्रु २०१९) तसेच यापुर्वी केरळ कँथाँलिक चर्चने इसाई परिवारासाठी एका कुटुंबाला ५ किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले होते. पाचपेक्षा जास्त मुल जन्माला घाला आणि दर महीन्याला दीड हजार रूपये मिळवा अस म्हणत ईसाई संस्थेनं याला जनकल्याणकारी योजना दिले होते. त्यातील चौथ्या व त्यानंतरच्या मुलाला पाला येथिल सेंट जोसेफ काँलेज आँफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नाँलाँजीमध्ये मोफत शिक्षण दिल जाईल. मुलांना जन्म देणा-या त्या आईला मार स्लीवा मेडिसिटी रूग्णालयात मोफत उपचार केले जातील. (टीव्ही ९ मराठी २८ जूलै २०२१) वरीलप्रमाणे इतर देश व धर्म लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न करताना दिसतात पण ते लोकांना विविध योजना देऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपणाची हमी देतात. परंतू स्वतः बिगर लग्नाच राहून मौज मजा करत देश अराजकतेच्या दिशेने घेऊन जाणारे संघ विचारधारेचे पाईक मात्र इतरांकडून जास्तीच्या मुलांची अपेक्षा करून ते संघ व विश्व हिंदू परिषदेसाठी मुल मागतात. तेव्हा त्या बांडगुळांनी १९५० साली आयोजित केलेल्या ब्राम्हण सभेतील ठरावावर थोडीसी नजर मारावी. कारण, स्वतः नपुंसक ठरलेले लोक इतरांच्या जिवावर धर्म संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
शेवटी बहुजनातील तरुण तरुणींना सागावं वाटत की, धर्माचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांपासून दूर रहा. ते तुम्हाला धर्म संकटात आहे, तुम्ही जास्त मुलं जन्माला घाला म्हणतील तेव्हा तुम्ही प्रश्न करा की, तुम्हाला किती मुलं आहेत ?तुमच्या आई वडीलांनी जन्माला घातलेल्या लेकरात तुमचा क्रमांक किती आहे ?साध्वींनी म्हटल्याप्रमाणे देव धर्मच जर संकटात असेल तर तो देव धर्म काय कामाचा ?शेतकरी आत्महत्या करून दररोज स्वतःला संपवतोय तेव्हा हे धर्माचे ठेकेदार कोणत्या बिळात लपलेले असतात. तो शेतकरी हिंदू नाही का ?तरुण सुशिक्षित बेरोजगार होऊन वनवन फिरून नैराश्याने आपल जीवन संपवतोय तेव्हा धर्म नेमक करतो तरी काय ?हे प्रश्न धर्माच्या ठेकेदारांना विचारून स्वतः ही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा नाहीतर धर्म जसा बिनबुडाच्या पिचक्या गाडग्याप्रामाणे आहे तसाच राहील. मात्र तुमच्या शरीराची वाठ लागेल त्यामुळे वेळीच सावध व्हा. धर्माचा गांजा ओढू नका, एकदा गांजा ओढला की धर्माची नशा येते.

‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *