आज मातृ पृथ्वी दिन

आज मातृ पृथ्वी दिन

आज मातृ पृथ्वी दिन

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

दरवर्षी २२एप्रिल रोजी पृथ्वी दिवस किंवा आंतरराष्ट्रीय मातृ पृथ्वी दिन
जागतिक स्तरावर साजरा केला जातो. पृथ्वीच्या आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाचे समर्थन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सन १९७० मध्ये हा दिवस साजरा होण्यास प्रारंभ झाला. संयुक्त राष्ट्र संघाने २००९मध्ये आंतरराष्ट्रीय मातृ पृथ्वी दिन म्हणून पृथ्वी दिनाचे नामकरण अधिकृतपणे केले.

पर्यावरणाचा रक्षणासाठी जगभरात दरवर्षी पृथ्वी दिवस अर्थात अर्थ डे साजरा केला जातो. यासाठी २२ एप्रिल हा दिवस ठरवण्यात आला आहे. पृथ्वी आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अर्थ डे साजरा करण्यात येतो.

१९७० सालापासून अर्थ डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यानंतर जगभरातील जवळपास १९५ देश अर्थ डे साजरा करतात. हे जगातील सर्वात मोठं जनजागृती आंदोलन आहे, ज्यात एकाच वेळी १९५ देशांमधील अब्जावधी नागरिक सहभागी होतात आणि पृथ्वीच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेतात.

पृथ्वी दिवसचे ५२ वर्षे

याआधी पृथ्वी दिवस दोन वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असे. २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जात होता, संयुक्त राष्ट्राचीही याला परवानगी होती. तर २२ एप्रिलला पृथ्वी दिवस साजरा केला जात असे. पण २२ एप्रिल १९७० पासून जगभरातील १९५ देश या दिवशीच पृथ्वी दिवस साजरा करतात. यंदा पृथ्वी दिवसला ५२वर्ष पूर्ण झाली आहेत.

रंजक इतिहास

२२ जानेवारी १९६९ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सँटा बार्बरामध्ये तीन मिलियन गॅलन तेल समुद्रात सांडलं. यामुळे १० हजारांपेक्षा जास्त समुद्र पक्षी, डॉल्फिन, सील आणि सी लायन्सचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अमेरिकेचे सीनेटर गेलॉर्ड नेल्सन अतिशय दु:खी झाले. त्यांनी पर्यावरणासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. त्यानंतर २२ एप्रिल १९७० रोजी जवळपास दोन कोटी अमेरिकन नागरिक पृथ्वी दिवसात सहभागी झाले. गेलॉर्ड नेल्सन यांना फादर ऑफ अर्थ डे म्हणूनही संबोधलं जातं.

तारखेमागचं लॉजिक

सीनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी २२ एप्रिल हीच तारीख का निवडली? यामागेही एक लॉजिक आहे. त्यांनी अशी तारीख निवडली, ज्या दिवशी जास्तीत जास्त सहभागी होऊ शकतात. त्यांना यासाठी १९ ते २५ एप्रिलपर्यंतचा आठवडा योग्य वाटला.

‘अर्थ डे’ शब्द कसा तयार झाला?

लोकांमध्ये ‘अर्थ डे’ हा शब्द रुळवण्याचं काम सर्वात आधी अमेरिकेतील कॉपीरायटर ज्युलियन कोनिग यांनी केलं. १९६९ मध्ये त्यांनी जगाला या शब्दाची ओळख करुन दिली. बर्थ डे या शब्दावरुन अर्थ डे तयार झाला. बर्थ डे आणि अर्थ डे या शब्दांचं यमक जुळत असल्याचं कोनिग यांनी सांगितलं. योगायोग म्हणजे ज्युलियन कोनिग यांची जन्मतारीखही २२ एप्रिल आहे.

प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी विशेष थीम असते.वसुंधरा दिन संघटनेनुसार वसुंधरा दिन २२ एप्रिल ची थीम ‘आमच्या ग्रहामध्ये गुंतवणूक करा’ अशी आहे. प्रदूषण,ग्लोबल वार्मिंग,पाणी टंचाई आणि इतर संकटापासून पृथ्वीला वाचविण्यासाठी ते एक संपत्ती कशी असू शकते असा संदेश ही थीम द्वारे दिला जात आहे.
आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपली उपजीविका आणि आपला ग्रह एकत्रितपणे जतन करण्याची वेळ आली आहे.असा मोलाचा संदेश या घोष वाक्यातून दिला जात आहे.

९५६१५९४३०६

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *