इचलकरंजी/प्रतिनिधी -आपल्या कार्य कर्तृत्वाच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण करणार्या व्यक्तींना पुरस्कार रुपाच्या प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा आधार संस्थाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन केले जात असून गोरगरीब सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी काढले.आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना आधार गौरव व आधार विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. कारंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर होते.यंदा संस्थेच्या वतीने हाजी सलीम बागवान यांना ‘आधार भूषण’ तर माजी नगरसेवक अहमद मुजावर (सामाजिक), बापूसाहेब चौधरी (अभियंता), डॉ. आयुब विजापूरे (वैद्यकिय), डॉ. असिफ सौदागर (वैद्यकिय) व अॅड. रियाज बाणदार (न्याय क्षेत्र) याना ‘आधार गौरव’ पुरस्कार त्याचबरोबर गौसुलआजम पटेल, निलोफर तांबोळी, डॉ. आसिया फकिर व मोहसीन मुल्ला यांना ‘आधार विशेष’ पुरस्काराने गौरविण्यात आले. आणि सलीम म्हालदर यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार देण्यात आला.अध्यक्षस्थानावरुन बोलताना शशांक बावचकर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासण्याचे काम आधार संस्थेकडून केले जात आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असून देशात राजकारणातून वातावरण गढुळ होत असताना इचलकरंजीत सामाजिक सलोखा व एकता जोपासली जात असल्याचे सांगितले.प्रारंभी आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर स्वागत तर आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबुब मुजावर यांनी प्रास्ताविक केले. बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष लतिफ गैबान, युसूफ तासगांवे, नुरमहंमद बागवान, सौ. साजिदाबानू मुजावर, सौ. बिलकिस मुजावर, शहनाज मोमीन, ताहेरा बागवान, शहिदा शिरगांवे, वहिदा नेजकर, रेश्मा शिरगांवे, नाजिया ढालाईत, फिरोजाबानु गैबान, बद्रेआलम देसाई, सलीम ढालाईत, फारुक अत्तार, युसूफ मुल्ला, जकी मुजावर,शकिल मुजावर, झाकीर मुजावर, रफिक मुल्ला, मेहबुब सनदी, इम्तियाज म्हैशाळे, मखदुम जमादार, दिलावर मोमीन, रसुल सय्यद, सैफुल मुजावर, वाजिद तासगांवे, इम्रान तासगांवे आदी उपस्थित होते. आभार हारुण पानारी यांनी मानले. सूत्रसंचालन फरीद मुजावर यांनी केले.
Posted inकोल्हापूर
आधार गौरव व आधार विशेष पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
