सन्मती बँक कर्मचार्यांना 20 टक्के पगार वाढीचा करार
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील सन्मती सहकारी (मल्टीस्टेट) बँकच्या कर्मचार्यांचा वेतनश्रेणी करार संपुष्टात आल्याने सन 2022 ते 2027 सालचा नवीन वेतन श्रेणी करार करणेत आला. बँकेच्या प्रगतीमध्ये सेवकांनी सन 2022 ताळेबंद व नफा-तोटा पत्रक व नफा चांगला झाला. संचालक मंडळ व सेवक यांच्यात वेतनश्रेणी करार होवून बँकेतील कायम सेवकांना 1 एप्रिलपासून मूळ पगारात 20 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती चेअरमन सुनिल पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, बँकेतील कर्मचार्यांना सवलतीच्या व्याजदरात दीर्घ मुदतीचे गृहकर्ज 6 टक्के व्याजदाराने, वाहन, शैक्षणिक व वैयक्तीक कर्ज 7 ते 8 टक्के व्याजदाराने उपलब्ध करण्यात येत आहे. बँकेच्या सेवकांचा नेहमीच विचार केला जात असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडीक्लेम विमा 1 ते 2 लाखाचा उतरविला आहे. शहरातील प्रसिद्ध अलायन्स, सेवासदन-निरामय हॉस्पिटल व कोल्हापुर येथील अॅस्टर आधार हॉस्पिटल मध्ये सेवकांना उपचाराची व्यवस्था केलेने कोणत्याही साध्या आजारावर उपचाराचा खर्च बँक करणार आहे. प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी, बोनस या सर्व सवलती लागू केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे सेवकांना कोणतीही पगार वाढ दिली नव्हती. बँकचे सभासद, खातेदार, हितचिंतक, कर्जदार यांचे सहकार्य व सेवकांचे परिश्रमामुळेच बँकेने गरुडझेप घेतली आहे. बँकेच्या नफा तोटा पत्रकावर नियमापेक्षा जादा खर्च पडणार नाही याची दक्षता घेवून पगार वाढीचा वार्षिक खर्च 0.75 टक्केपेक्षा कमी राहील असेही चेअरमन पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र व कर्नाटक (हनगल) या दोन्ही राज्यात बँकेचा कार्यविस्तार असून चालू आर्थिक वर्षात कोविडची दुसरी लाट असताना देखील बँकेने ठेवी 326 कोटी 31 लाख इतक्या ठेवी जमा केलेल्या आहेत. कर्जे 198 कोटी 21 लाख इतके वाटप केले आहे. गुंतवणुक 139 कोटी 65 लाख, भागभांडवल 7 कोटी 62 लाख व रिझर्व्ह फंड 24 कोटी 42 लाख जमा झालेला आहे . ढोबळ नफा 2 कोटी 53 लाख इतका झालेला आहे. गेल्या दोन वर्षात कोविड व महापुर या दोन्ही संकटातुन जात असताना सेवकांनी चांगले कामकाज करून बँकेच्या प्रगतीस हातभार लावला आहे . बँकेने प्रत्येक वर्षी उत्कृष्ठ नफा, सतत ऑडीट वर्ग अ, ठेवीमध्ये भरीव वाढ करीत असताना बँकेच्या प्रगतीमधील मुख्य घटक म्हणजे सेवक असून त्यांना पगार वाढ दिली. तसेच सेवकांना वेळोवेळी प्रशिक्षणास पाठवून त्यांच्या ज्ञान व कौशल्यात भर पडली आहे हे बँकेच्या प्रगतीसाठी मोलाचे आहे, असे व्हा . चेअरमन महादेव कांबळे यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अजित कोईक, शितल पाटील, डॉ. पी. व्ही . कडोले, चंद्रकांत पाटील, डॉ. अरूण कुलकर्णी, आण्णासो मुरचिटे, शिवाजी माळी, प्रदिप मणेरे, विठ्ठल चोपडे, डॉ. आप्पासो होसकल्ले, संजय चौगुले, प्रा . ए .जे . पाटील, श्रीमती जयश्री चौगुले, सौ. वसुंधरा कुडचे, तज्ञ संचालक महावीर येळरूटे व मनिष पोरवाल व सीईओ अशोक पाटील असि. सीईओ समीर मैंदर्गी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
सन्मती बँक कर्मचार्यांना 20 टक्के पगार वाढीचा करार
