महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांना अटक होणार?
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
1 मे रोजी महाराष्ट्र दिना दिवशी राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेसाठी पोलिसांनी काही नियम आणि अटींचे पालन करण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते परंतु या अटींचे पालन न केल्यामुळे आज अक्षय तृतीया दिवशी व ईदच्या दिवशी राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अत्यंत तापलेले आहे. सभेच्या आयोजकांवरही अटीशर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर म्हणजे मुंबई निवासस्थानी लवकरच पोलिस दाखल होतील असे सूत्रांनी सांगितले आहे. राज साहेब ठाकरे यांच्या अटकेच्या नंतर महाराष्ट्रातील वातावरण बिघडू शकते यामुळे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स एस. आर. पी यांच्यासह पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
एक मे च्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरण्याचा अल्टिमेटम दिला होता तीन तारीख पर्यंत उतरवले नाही तर चार तारखेला त्यांच्या मशिदीसमोर त्याच्या डबल आवाजात आम्ही हनुमान चालीसाचे पठण करू असे आदेश राज साहेब ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते आणि या त्यांच्या भाषणानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील वातावरणात वादळ निर्माण झाले आहे. राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर हे सर्व चालू आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक झाली आणि झालेल्या बैठकीत राज्यातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कोणत्याही परिस्थितीत आम्ही हनुमान चालीसाचे पठण करणार काय ते होऊन जाऊन देत असा निर्वाणीची भूमिका घेतली आहे . शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी एक बाहेरील शक्ती कार्यरत आहे असा आरोप केलेला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन जनतेला केले आहेत तसेच आम्ही जनतेला आवाहन करते की कोणत्याही प्रकारचा अफवांना बळी न पडता राज्यात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. पोलीस आणि जनतेनी संयम दाखवून या कठीण प्रसंगी राज्याचे रक्षण करणे हे आपल्या हातात आहे असे आव्हान सर्वांनी करण्यात येत आहे.