राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे साहेबांना आवाहन!
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
राज ठाकरे यांनी सरकारला भोंग्या संदर्भात 3 मेचा अल्टिमेटम दिला होता. आणि त्या अल्टीमेटची वेळ आता संपत येत आहे. उद्या ज्या मशिदीवरून मोठ्या आवाजात अजान, बांग दिली जाईल त्या मशिदी समोर हनुमान चालीसा लावा असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे. लोकवस्ती असलेल्या भागात कमीत कमी दहा डेसिबल आवाजात भोंगे लावता येतात आणि नियमाचे पालन करून जर कोणी भोंगे उतरत असतील किंवा नियमाचे पालन करत असतील तर त्याठिकाणी हनुमान चालीसा पठण करण्याची गरज नाही असा सल्लाही राज ठाकरे आणि मनसे सैनिकांना दिलेला आहे.
“अभी नहीं तो कभी नहीं” भोग्याचा त्रास काय होतो? ते सर्वसामान्य जनतेला कळले पाहिजे म्हणून हा आमचा प्रयत्न आहे हिंदुहृदय सम्राट ळासाहेब ठाकरे यांचाही मशिदीवरील भोंग्यांना विरोध होता. बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची सूचना त्यावेळी दिली होती आताचे सरकार बाळासाहेब चा साहेब सरकारचे म्हणणे मानणार की शरद पवारांच्या ईच्छेला मान देणार? असा खोचक सवालही राज ठाकरे यांनी विचारलेला आहे. आमचा भोंग्याचा विषय हा राजकीय नसून सामाजिक आहे मशिदीवरील भोंगे तुम्हाला उतरावेच लागतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या देशातील प्रत्येक नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे पालन केले पाहिजे. धर्माच्या नावाखाली अनेक आजारी वयोवृद्ध, अशक्त, लहान मुलं त्यांना वेळी अवेळी भोंग्यांचा त्रास होतो तो आता थांबवला पाहिजे. हे कार्य एकाच दिवसात होणार नाही यासाठी सर्वानी साथ दिली पाहिजे असे राज ठाकरे यांनी भावनिक आवाहन करून आपल्या महाराष्ट्रीय जनतेला जागृत राहण्याची विनंती केली आहे. माझा भोंग्यांचा विषय राजकीय नसून सामाजिक विषय आणि या सामाजिक विषयाला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंग्याला परवानगी असते असे असतानाही दिवसातून पाच वेळा अजन होते आणि त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे आणि याची दखल राज्य सरकारने घ्यावी. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने तेथील भोंगे हटवले आहे असे असताना राज्य सरकार मागे का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारलेला आहे. राज्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसैनिकांना ताब्यात घेतलेले तर काहीना नोटीस दिलेल्या आहेत. आम्हाला देशातील शांतता हवी आहे, देशात आम्हाला दंगली नको. कायद्याचे राज्य असल्यामुळे कायद्याचे पालन झाले पाहिजे याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला आहे. रस्त्यावर नमाज पडून वाहतूक कोंडी करणे हे कोणत्या धर्मात बसते? असा प्रश्न विचारून त्यांनी सरकारला धारेवर धरले आपल्या भोंग्याच्या मुद्यावर राज ठाकरे हे ठाम राहिले आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रात नवीन संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या पत्रकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे काय उत्तर देतात? या गोष्टीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून गेले आहे. आता भोंग्यांचा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेला असून आता त्याची झळ देशातील कानाकोपऱ्यात पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संवेदनशील विभागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वर्षा या मुख्यमंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली व वरीष्ठ पोलीस अधिकारी वर्गाला योग्य ती खबरदारी घेण्याची सुचना दिली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी मनसैनिकांनी गर्दी केली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत दिलेल्या सुचनांचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री कार्यालयासह विरोधी पक्षनेते नजर ठेवून आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचे आंदोलन भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे असे सांगितले आहे.भोंग्यांवरुन होणारे रणकंदन मात्र सर्व सामान्य माणसाच्या मनात धडकी भरवून गेले आहे. अशा वातावरणात जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस व प्रसार माध्यमांनी केले आहे.