कबनूर येथे ईद-उल-फित्र (रमजान ईद) मोठ्या उत्साहात साजरी
कबनूर -(प्रतिनिधी चंदुलाल फकीर) मुस्लिम समाजाच्या रमजान या पवित्र महिन्यामध्ये पवित्र कुरान शरीफचे अवतरण झाले असल्याने प्रत्येक मस्जिदमध्ये हाफिज व्यक्तीकडून संपूर्ण महिन्यांमध्ये कुराणाचे वाचन केले जाते व रोजे धरले जातात. मुस्लिम एक तारखेला सुरू होणारे महिनाभराचे रोजे संपल्यानंतर ईद साजरी करण्याचा उत्सवाचा येणारा दिवस म्हणजेच ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद कबनूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी नियोजित ठरलेल्या वेळेप्रमाणे सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाज करता इदगा ठिकाणी एकत्र जमल्यानंतर हाफिज यांनी नमाज पठण केले. नमाज नंतर संपूर्ण विश्वातील मानव जातीच्या कल्याणा करता सर्व मानव जातीमध्ये भाईचारा राहावा, सर्वजण प्रेमभावनेने, सलोख्याने राहावेत, सर्वांनाच अल्ला ईश्वर चांगली बुद्धी देवो अशी अल्लाजवळ दुवा (प्रार्थना) करण्यात आली. यानंतर सर्व मुस्लिम बांधवानी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.आज दिवसभरात मित्रमंडळी पाहुण्यांमध्ये (शीरखुर्मा) खिरीचे वाटप सुरू होते. मुस्लिम समाजामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत होते.
Posted inकोल्हापूर
कबनूर येथे ईद-उल-फित्र (रमजान ईद) मोठ्या उत्साहात साजरी
