इचलकरंजी ता. ४ मे २०२२ – उदयोन्मुख कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेले इचलकरंजी फेस्टीव्हल यंदा मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात व दणक्यात साजरा करण्याचा निर्णय आज फेस्टीव्हल चे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे व कार्याध्यक्ष अहमद मुजावार व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून पुणे फेस्टीव्हल च्या धर्तीवर २२ वर्षांपूर्वी इचलकरंजी फेस्टीव्हल ची सुरुवात करण्यात आली. आणि आज गणेश उत्सव व इचलकरंजी हे जणू समीकरणच बनून गेले आहे. शहर व परिसरातील उदयोन्मुख कलाकारांना इचलकरंजी फेस्टीव्हलच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे. याठिकाणी कला सादर केलेल्या अनेक कलाकारांनी आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचा नावलौकिक केला आहे.
मागील दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे शासन निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे फेस्टीव्हल भरवता आले नाही. आता निर्बंध हटले असून यंदा इचलकरंजी फेस्टीव्हल मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात पुढील माहिती लवकरच कळविण्यात येईल, असेही सांगण्यात आले.बैठकीस प्रकाश दत्तवाडे, शेखर शहा, बाळासाहेब कलागते आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
इचलकरंजी फेस्टीव्हल मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा होणार !
