सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश ; दोन आठवड्यात महापालिका, झेडपी निवडणूका जाहीर करा
एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ओबीसी आरक्षण प्रकरणी एका आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, तात्काळ निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले आहेत.
मार्च 2020 च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश देत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दणका दिला आहे.जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. दरम्यान राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेणार हे पाहून महत्त्वाचे ठरणार आहे. कारण राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याची भूमिका घेतली होती.