अजान दिली तर हनुमान चालिसा लावली जाणारच”; राज ठाकरे अजूनही निर्णयावर ठाम

अजान दिली तर हनुमान चालिसा लावली जाणारच”; राज ठाकरे अजूनही निर्णयावर ठाम

“अजान दिली तर हनुमान चालिसा लावली जाणारच”; राज ठाकरे अजूनही निर्णयावर ठाम

राज्यभरात सगळीकडे शांतता दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. कुठेही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये याची खबरदारी राज्य सरकारने आणि पोलिसांनी घेतलेली दिसून येत आहे. दुपारी 1 च्या अजानपूर्वीच मुंबईसह परिसरातील मनसे नेत्यांची धरपकड सुरु आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

90 टक्के ठिकाणी अजान बंद झाली. तर काही ठिकाणी 5 वाजायच्या आत लागली. काही ठिकाणी कमी आवाजात झाली. पोलिसांनी 5 वाजायच्या आत अजान झाली त्यावर कारवाई करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. लोकांना जो त्रास होत होता, तो कमी होईल. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणं आहे. मशिदींवर भोंग कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.

मशिदींवर कारवाई केली पाहिजे. 35 मशिदींवर कारवाई केली पाहिजे. अनधिकृत भोंग्याना परवानगी कशाला दिली गेली आहे. यांनीही रोजच्या रोज परवानगी मागीतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. हा विषय आजचा नाही तर तो कायमचा आहे. हा धार्मिक विषय नाही. धार्मिक वळण दिलं तर आम्हीही तसंच करु, असा स्पष्ट इशारा राज यांनी यावेळी दिला. भोंगा वाजला तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणारच. पोलिसांनी भोंग्यावर कारवाई केली पाहिजे. जर हे थांबले नाही तर पुन्हा उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले.

हा विषय केवळ आमचा नाही, क्रेडिटचा विषय नाही. हा समाजाचा विषय आहे. मला क्रेडिट नको. आम्ही गोष्टी सांगितल्या, त्या अनेक मौलवींना समजला, सरकारमध्ये पोहोचला. पोलिसांनाही धन्यवाद, त्यांनाही नीट समजलं. हा सर्वसमावेशक प्रयत्न होता, लोकांना जो त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा. केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा असेही ठाकरे म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *