महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या संदिप देशपांडेंना तात्काळ अटक करा – संभाजी ब्रिगेड
राज ठाकरे, संदीप देशपांडे आणि इतर लोकांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. पोलीस अधिकारी पकडायला आल्यामुळे संदीप देशपांडे पळून जात होता. त्याच वेळी त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ढकलून दिले. त्या महिला कर्मचारी खाली पडल्या. त्यांना दुखापत झालीआहे. तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री व गृहमंत्रालय संदीप देशपांडे यांना अटक करत नाही हे निषेधार्ह आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या संदिप देशपांडेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
याविषयी बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, जिजाऊ-सावित्री-अहिल्या यांचा हा महाराष्ट्र आहे. इथे महिलांची बदनामी, विनयभंग किंवा फालतू चाळे आम्ही सहन करणार नाही. मनसेच्या लोकांना महाराष्ट्र मध्ये धर्माच्या नावावर विद्वेषाचे राजकारण करून महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. मनसे नेत्यांची तात्काळ अटक झाली पाहिजे.
सरकार’ने भाऊबंदकी बाजूला ठेवावी
संपूर्ण महाराष्ट्र हा हिंदूंचा व इतर धर्मीयांचा सुद्धा आहे. जास्त प्रसिद्धी (TRP) मिळाली म्हणून लोकांनी गर्दी केली बाकी हे संपलेले आहेत. सरकारने औरंगाबादच्या सभेवर कठोर कारवाई केली नाही. असले पानचट (किरकोळ) गुन्हे कुणावरही दाखल होतात. यांना धर्माच्या नावावर महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. सरकार’ने भाऊबंदकी बाजूला ठेवून दंगल घडवणारे आणि वादग्रस्त बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. लोक लगेच जामिनावर सुटतात. नुसत्या 149 च्या नोटिसा काही कामाच्या नाहीत, असेही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले.