महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राज ठाकरेंनी ओकली जातीयवादी गरड : कार्याध्यक्ष जयदीप कवाडे

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राज ठाकरेंनी ओकली जातीयवादी गरड : कार्याध्यक्ष जयदीप कवाडे

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून राज ठाकरेंनी ओकली जातीयवादी गरड : कार्याध्यक्ष जयदीप कवाडे

९ मे ला राज ठाकरेंच्या “शिवतीर्थ” निवासस्थानी जाऊन थोर समासुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तका देणार राज ठाकरेंना भेट

मुंबई : राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकासोबत मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून मतांच्या राजकारणासाठी मस्जिद वरील भोंगे काढण्याचे चिथावणी वक्तव्य करून राज ठाकरे हे समाजात तेढ निर्माण करीत आहेत, त्यांना श्रीराम, हनुमान चालीसा आदींची गरज नसून त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधनाची नितांत गरज आहे. म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी ९ मे ला चैत्यभूमी येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भीमसैनिक त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे प्रबोधनात्मक पुस्तके भेट देणार, अशी घोषणा आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली.

भारतीय संविधानाने विविध धर्म, विविध भाषा, विविध पंथ, विविध राज्य, विविध संस्कृती, विविध बोली आदींना एकत्रित आणून हा भारत देश अखंडित ठेवला आहे. देशातील कोणताही व्यक्ती कुठेही राहू शकतो.आपला व्यापार करू शकतो, मात्र परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करून उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र आदी राज्यांच्या नागरिकांमध्ये भाषा-संस्कृती आदी विषयी राज ठाकरे यांनी विषारी वक्तव्य करून अनेकांचा बळी घेतला आहे. अनेकांची कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. महाराष्ट्रात काम करणारे उत्तर प्रदेश, बिहार चे कामगार परतल्याने महाराष्ट्रातील उद्योगांना कामगार न मिळाल्याने अनेक मराठी उद्योजकांचे उद्योग बुडाले याला कारणीभूत फक्त राज ठाकरेच आहेत, असा घणाघाती आरोपही कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला.

एकेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेत 13 आमदार निवडून आले आणि कालांतराने ते आमदार दुसऱ्या पक्षात का पळून गेले, याचे चिंतन करण्याऐवजी आज राज ठाकरे हे हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचे आदर्श बनत आहेत. त्यांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श पुढे ठेवून चालावे, हे त्यांनीच ठरवावे, मात्र आपले वंशज आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे आहेत, हे विसरू नये असा चिमटाही काढला.

कोरोना सारख्या जागतिक महामारी रोगातून आपण नुकतेच बाहेर पडत आहोत. राज ठाकरे यांनी केंद्राकडे राज्य सरकारचे असलेले 25 हजार कोटी रुपये परत आणण्याचा पाठपुरावा करावा आणि राज्याच्या विकास व्हावा याकडे भर द्यावा. मात्र राज्यातील महागाई, बेरोजगारी, गॅस दरवाढ, पेट्रोल-डिझेलची दरवाढ आदींवर बोलण्याऐवजी हिंदू मुस्लिम बांधवांना मध्ये तेढ निर्माण होईल, असे कृतिशील वक्तव्य करणे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता घाण ठेवणे होय. ज्येष्ठ समाजसेवक प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू राज ठाकरे असे कृत्य करत असतील तर यामागे त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे सुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्ट करावे व दुसऱ्याच्या सांगण्यावरून वक्तव्य करू नये, असा सल्लाही कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी यावेळी दिला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *