कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
कबनूर – (प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर येथील श्री महादेव मंदिर येथे वीरशैव लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.अजित पाटील यांच्या हस्ते पहाटे महाअभिषेक करण्यात आला. वीरशैव लिंगायत समाजातील युवकांनी अलमप्रभु येथून ” बसवज्योत” आणली. यावेळी बसवज्योतीचे समाज बांधवाकडून स्वागत करण्यात आले.
श्री बसवेश्वर जन्मकाळ सोहळा दुपारी १२ वाजता संपन्न झाला. समाजातील महिलांनी पाळणा गीते गायली यानंतर पूजा व आरती होऊन सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालेचे दिसून येत होते.
सायंकाळी ५ वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची पालखीमधून भव्य मिरवणूक सवाद्य काढण्यात आली .मिरवणुकीत सुंदर सजवलेल्या बैल जोड्या, कलशधारी महिला, अबालवृद्धासह सर्वांचा सहभाग होता. मिरवणूक महादेव मंदिरापासून झेंडा चौकातून फॅक्टरी रोड वरून अमोल पाटील व निलेश पाटील यांच्या घरी गेली तिथे पालखीचे स्वागत करून पूजन करण्यात आले. मिरवणूक त्याच मार्गे परत महादेव मंदिर येथे आली.
या नंतर महाप्रसादाचे वाटप झाले.रावसाहेब पाटील यांचे महाप्रसादासाठी विशेष सहकार्य लाभले.वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष रामगोंडा पाटील (ढंग),बि.डी. पाटील, अशोक पाटील, सुधीर पाटील, आप्पा पाटील, निलेश पाटील,दादा पाटील, पायगोंडा उर्फ दादा पाटील,प्रमोद पाटील, किशोर पाटील, सुमित पाटील, दिलीप पाटील, सुनिल पाटील, अमर स्वामी,भाऊसाहेब पाटील, यांच्यासह समाजबांधव महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
