मातोश्री वृद्धाश्रम कोल्हापूर येथे भरतनाट्य नृत्य कार्यक्रम उत्साहात संपन्न
माया केअर फाउंडेशनच्या सहसंस्थापक दिवंगत विद्या गोखले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम R.K नगर कोल्हापूर येथे जेष्ठ नागरिकांनासाठी भरतनाट्य नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संस्थेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिजीत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वयंसेवक अभिषेक यादव यांनी सूत्रसंचालन केले , शुभांगी चौगुले व अजय बिरादार यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये संयोगिताज् तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम कोल्हापूरच्या विद्यार्थिनींनी बहारदार असे नृत्य सादर करून ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली... या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक आनंदात रमून गेले त्यांच्या चेहऱ्यावर एक सुखद आनंद दिसत होता.
माया केअर फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आनंदासाठी आणि आत्मनिर्भर पणा साठी मोफत मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणे ,बँक कामांमध्ये मदत करणे ,बाहेरुन वस्तू आणून देणे , बागेमध्ये फिरायला घेऊन जाणे तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे.
अशा प्रकारची मदत ज्येष्ठ नागरिकांनी आत्मनिर्भर बनावे व आनंदात जीवन जगावे यासाठी केली जाते. ही सुविधा कोल्हापूर सह भारतातील 39 शहरांमध्ये व UK तील 4 शहरांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. व संस्थेचा हेल्पलाइन नंबर ही उपलब्ध आहे.
तसेच या संस्थेचे मागील कामकाज 100 पेक्षा जास्त अपंग लोक आपल्या घरी बसून करत आहेत. त्यामुळे अपंग लोकांना रोजगारही उपलब्ध होत आहे.
जगातील प्रत्येक शहरातील ज्येष्ठांना ही सुविधा मिळावी व तेथील अपंग लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दिशेने संस्थेचे कामकाज चालू आहे.