🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷
खासदार धैर्यशील माने यांच्या खास प्रयत्नामुळे इचलकरंजी पालिकेस ९८ कोटी ९ लाख सहाय्यक अनुदान मिळाले
कर्मचाऱ्यांची सर्व थकीत देय रकमा प्रथम भागवा आणि पुरेशी रक्कम सुरक्षित निधीत ठेवा
मा, उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांची मागणी
➖➖ *इचलकरंजी* :➖➖
*येथील नगरपालिकेस ९८ कोटी ९ लाख रुपये एवढे सहाय्यक अनुदान आज प्राप्त झाले,खासदार धैर्यशील माने यांनी या कामासाठी खास प्रयत्न केले*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची देय रकमा प्राधान्याने भागवली जावीत, त्यात सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ दिली जावी, तसेच भविष्यकाळात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी रक्कम सुरक्षित ठेवा ठेवा,
अशी मागणी रवी रजपुते सोशल फौंडेशनने पालिका प्रशासन कडे केली, अशी माहिती मा, उपनागराध्यक्ष रवी रजपुते यांनी केली,
सेवा निवृत्तकर्मचाऱ्यांची देय रक्कम, सातव्या वेतन आयोगाचा फरक, सुट्टीचा पगार, महागाई भत्याचा फरक, मेडिकल बिले, शिल्लक हक्काचा रजेचा फरक, कालबद्ध पदोन्नतीचा फरक या सर्व देय रक्कमा थकीत होत्या, त्यासाठी विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधीसह मी स्वतः गेल्या दोन वर्षपासून प्रयत्न करीत होतो, शासनाकडे नगरपालिकेचे १३७ कोटी रुपये सहाय्यक अनुदान रक्कम थकीत होतें ते तात्काळ मिळावे अशी आग्रही मागणी करण्यात येत होती, असे स्पष्ट करून रवी रजपुते म्हणाले की खासदार धैर्यशील माने, पालमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, यांनी या कामात विशेष परिश्रम घेऊन ताकद लावली तर नगरसेवक रवि माने,सागर चाळके,प्रकाश मोरबाळे ,मदानराव कारंडे, , राहुल खंजिरे,शशांक बावचकर,तानाजी पोवार, कामगार नेते आण्णा कागले, शिवाजी जगताप,प्राचार्य ऐ बी पाटील, के के कांबळे, संजय कांबळे, सुभाष मालपाणी, आदींसह मी स्वतः आदींनी या सहाय्यक अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरवठा केला आहे, असेही रवी रजपुते यांनी स्पष्ट केले,
🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷
नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची सगळी देय रक्कम ९८ कोटीतून भागवून उर्वरित राकमेपैकी पुरेशी रक्कम फक्त कर्मचऱ्यासाठी सुरक्षित ठेवावी त्यातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक निधीसाठी धावपळ करावी लागणार नाही, यामुळे या ९८ कोटी ९ लाखात प्रथम कर्मचारी वर्गाची सर्वं प्रकारची सर्वच देणी प्रथम भागवावीत ,किंबइना,शासनाच्या आदेशातही अशीच टिप्पणी दिली आहे, असे रवी रजपुते यांनी स्पष्ट केले.
🪷🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷🪸🪷🪸